आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: हॉटेल व्यावसायिकासोबत लग्नगाठीत अडकली आहे 'खल्लास गर्ल', इंदर कुमारसोबत होते 10 वर्षे रिलेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज अभिनेत्री ईशा कोप्पीकर 41 वर्षाची झाली आहे. ईशाला बॉलिवूडमध्ये 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखले जाते. 1999 साली आलेल्या 2000 साली आलेल्या कंपनी चित्रपटातून ईशाला लोकप्रियता मिळाली होती. ईशाने त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटात काम केले पण तिला सफलता मिळाली नाही. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. हॉटेल व्यावसायिकाच्या पडली प्रेमात..
 
हॉटेल व्यावसायिकाच्या पडली प्रेमात पडली ईशा कोप्पीकर..
2009 साली ईशाने हॉटेल व्यावसायिक टीमी नारंगसोबत विवाह केला. प्रिती झिंटाने ईशा आणि टीमीची ओळख करुन दिली होती. तसे पाहिले तर ईशा आणि टीमी अगोदरपासून एकमेकांना ओळखत होते पण प्रिती झिंटाने करुन दिलेल्या या ओळखीमुळे हे दोघे एकमेकांच्या जास्त जवळ आले आणि प्रेमात पडले. 29 नोव्हेंबर 2009 साली ईशा आणि टीमी लग्नगाठीत अडकले. 
 
मुळ कोकणी कुटुंबातील आहे ईशा कोप्पीकर..
ईशा कोप्पीकरचा जन्म 19 सप्टेंबर 1976 साली मुंबई येथे झाला. ईशा कोप्पीकर मुळची कोकणी कुटुंबातील आहे. तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. कॉलेजमध्ये असतानाच ईशाने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. अनेक जाहिरातीत काम केल्यानंतर ईशा इंडस्ट्रीत ओळखीचा चेहरा बनली आणि तिला 1998 साली तेलुगु चित्रपट 'चंद्रलेखा'मधून डेब्यू मिळाला. 
 
'खल्लास गर्ल'ने केले 40 चित्रपटात काम..
ईशाने आतापर्यंत जवळपास 40 चित्रपटात काम केले आहे. यात केवळ हिंदी नाही तर विविध पाच भाषांच्या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी अनेक चित्रपट यशस्वी ठरले. 
 
इंदर कुमारसोबत होती 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये...
दिवंगत अभिनेता इंदर कुमारसोबत ईशा कोप्पीकर 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती. ईशाला इंदरसोबत लग्न करण्याची इच्छा होती इतकेच नाही तर इंदरच्या घरच्यांच्याही जवळ ईशा होती. 1998 साली ईशा आणि इंदर प्रथम एकमेकांना भेटले होते. साल 2002 पर्यंत सर्वकाही ठिक चालले पण काही कारणाने दोघांनी एकमेकांपासून काही वेळ ब्रेक घेण्याचे ठरवले. ईशाची लोकप्रियता दोघांच्या रिलेशनशीपमध्ये येत होती. 2003 साली इंदर कुमारने अचानकपणे सोनल कारिया, (चित्रपट पब्लिसीस्ट राजु कारिया यांची मुलगी) सोबत लग्न केले पण हे लग्न केवळ 5 महिने टिकले. 
 
इंदरसोबत लग्न करण्याची होती इच्छा..
2006 साली दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली होती. पण इंदर त्यावेळी लग्नाला तयार नव्हता. जेव्हा हे ईशाला कळाले तेव्हा तिने इंदरपासून कायमचे ब्रेकअप करण्याचे ठरवले. ते वर्ष होते 2008. त्यानंतर 2009 साली ईशा टीमी नारंगसोबत लग्नगाठीत अडकली.
 
साध्या पद्धतीने केला विवाह 
रिच मॅन टीमी नारंगसोबत विवाह करत असतानाही त्यांनी साध्या पद्धतीने सर्व विधी पार पाडले. या लग्नाला बॉलिवूड आणि अनेक टीव्ही कलाकारांनी उपस्थिती लावली. 2014 साली ईशाने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव रियाना आहे. ईशा सध्या पूर्ण वेळ तिच्या कुटुंबाला देत आहे. 
 
पुढच्या सलाईडवर पाहा, ईशा आणि टीमी नारंगचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...