आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करण जोहरला 'आर्ची-परशा' गवसले, शाहिदचा सावत्र भाऊ 'परशा', श्रीदेवीची मुलगी होणार 'आर्ची'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर मराठीतील माइलस्टोन ठरलेल्या 'सैराट'चा हिंदी रिमेक करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. करण जोहरने सैराटचे हक्क विकत घेतले आहेत. सैराट या सिनेमातून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे नवोदित चेहरे एका रात्रीतून सुपरस्टार झाले. नागराज मंजुळेंनी त्यांच्या सिनेमासाठी प्रसिद्ध कलाकार न घेता नवोदितांना मोठ्या पडद्यावर लाँच केले होते. आता करण जोहरसुद्धा हाच फॉर्मुला अंमलात आणणार आहे. करणलासुद्धा आता त्याचे आर्ची-परशा गवसले आहेत. शाहिदचा सावत्र भाऊ साकारणार परशा....

मिड डे या वृत्तपत्राने प्रकाशि केलेल्या वृत्तानुसार, अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी प्रेक्षकांचा विचार करता करण सिनेमाच्या कथेत काही बदल करत आहे. मात्र, इशानने यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. इशानची आई आणि अभिनेत्री निलिमा म्हणाल्या, की त्याच्या पदार्पणाबद्दल आता चर्चा करणं चुकीचं राहिल. सिनेमाचे निर्माते योग्य वेळी त्याची माहिती देतील. इशानच्या समोर करियर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. आपल्या भावाप्रमाणेच नृत्याची आवड असलेला इशान एक अभिनेता म्हणून कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांमध्ये उत्सुकता पाहावयास मिळतेय.
खरं तर इशान खट्टर हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या एक वर्षापासून होत आहेत. करण जोहरच्या 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमात तो काम करणार असल्याचाही तेव्हा अंदाज लावला जात होता. त्यानंतर त्याने इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी याच्या पुढील सिनेमात स्थान मिळवल्याचे म्हटले जात होते. पुन्हा सैफ अली खान याची मुलगी सारा खान आणि त्याची हॉलिवूडमधील ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या सिनेमाच्या बॉलिवूड रिमेकसाठी जोडी जमल्याचीही कुजबूज होती. मात्र आता इशानचे नाव सैराटच्या हिंदी रिमेकसाठी पुढे आले आहे. निलिमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा इशान हा शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. शाहिदचे वडील पंकज कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर निलिमा यांनी 1990 मध्ये राजेश यांच्यासोबत लग्न केलं होतं.

श्रीदेवी-बोनी कपूरची लेक साकारणार आर्ची...
या सिनेमात इशानसह बॉलिवूडची मिस हवाहवाई म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर आर्चीची भूमिका साकारणार आहे, त्यामुळे इशान आणि जान्हवी ही फ्रेश जोडी आता प्रेक्षकांना भावते, का हे येणा-यात काळ स्पष्ट होईल.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, बॉलिवूडचे आर्ची-परशा अर्थातच जान्हवी आणि इशानची निवडक छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...