आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : दोन तरुणांसोबत रोमान्स करताना या अॅक्ट्रेसला यायचे रडू, आईने वाढवली हिंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मुझे शॉर्ट टर्म इंज्वायमेंट में कोई इन्ट्रेस्ट नहीं, मुझे तो जिंदगी भर की अय्याशियां खरीदनी है।'' या पंचलाईनसोबत रिलीज झालेला 'इश्क जुनून' या आगामी सिनेमाचा ट्रेलर यूट्युबवर बराच गाजतोय. या सिनेमातील मुख्य अभिनेत्री दिव्या सिंहने सांगितले, की दोन-दोन तरुणांसोबत एकाचवेळी रोमान्स करणे ही सोपी गोष्ट नव्हती. शूटिंग सुरु असताना तिला रडू कोसळायचे. मात्र तिची आई नेहमीच तिच्या सोबत असायची आणि तिची हिंमत वाढवायची. शूटिंगच्या काळात दिव्याला वाटायची भिती...

- दैनिक भास्करचे रिपोर्टर ओम प्रकाश विपुल यांच्याशी बातचित करताना दिव्याने सांगितले, की एकाचवेळी दोन तरुणांसोबत रोमान्स करणे फार विचित्र भावना होती.
- ख-या आयुष्यात ही अशक्य बाब आहे. सिनेमाच्या शूटिंग सुरु होताच अनामिक भिती वाटत असल्याचेही दिव्या म्हणाली.
- शूटिंग सुरु असताना दिव्याला रडू कोसळायचे. मात्र तिची आई नेहमी तिच्या सोबत असायची. आईने दिलेल्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारु शकल्याचे दिव्या म्हणाली.

थ्री सम थीमवर आधारित आहे सिनेमा...
- दिव्याने सांगितले, की फिल्म 'इश्क जुनून'ची थीम वेगळी आहे. हा सिनेमा बॉलिवूडचा पहिला थ्री सम थीमवर आधारित सिनेमा आहे.
- थ्री समचा अर्थ म्हणजे असे एक नाते, ज्यामध्ये एकाचवेळी तीन जण थेट इन्वॉल्व असतात.
- सिनेमाची कथा एका अशा तरुणीची आहे, जी एकाच वेळी दोन तरुणांच्या जाळ्यात अडकते.
- एका तरुणावर तिचे प्रेम असते, तर दुसरा मात्र तिला काहीही करुन मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. दिव्याने सिंहने सिनेमात पाखी नावाच्या बोल्ड युवतीची भूमिका साकारली आहे.

सिनेमा बघितल्यानंतर येईल चांगल्या-वाईट गोष्टींची समज
- दिव्या म्हणते, हा सिनेमा आजच्या तरुणाईसाठी आहे. सिनेमा बघितल्यानंतर त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक समजेल.
- आजची तरुणाई आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाईट मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य खराब होते.
- सिनेमात दिव्यासोबत अक्षय रंगशाही आणि राजवीर सिंह लीड रोलमध्ये आहेत. गायक अभिजीत सिंह, आलिया सिंह, अंकित तिवारी, रेखा भारद्वाज आणि मोहन चौहान यांनी सिनेमातील गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.
दिव्याला व्हायचे होते एअर होस्टेस
- दिव्याने औरंगाबाद (बिहार)मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एअर होस्टेस बनण्यासाठी दिल्लीत दाखल झाली. येथे तिने यासाठी डिप्लोमा कोर्स केला.
- सुरुवातीपासून अभिनयाची आवड असल्याने तिने अभिनयाचे धडे गिरवले. आई नीलम सिंह यांनी तिला कला क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी प्रेरणा दिली.
- दिल्लीतनंतर दिव्या मुंबईत आली आणि येथील विदुर नाट्य संस्थेत प्रवेश घेतला.
- याच काळात एका मित्राच्या मदतीने तिची तामिळ दिग्दर्शक शशी शेखर यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी तिला ऑडीशननंतर पगडई पगडई या सिनेमात भूमिका ऑफर केली.

अॅड फिल्म्समधून सुरु केले होते करिअर...
- सुरुवातीच्या काळात दिव्याने लहान-मोठ्या जाहिरातींमध्ये काम केले. याच काळात तिला तेलगू सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ती हैदराबादला शिफ्ट झाली.
- येथे काही सिनेमांमध्ये तिने काम केले. येथेच तिची ओळख इश्क जुनून सिनेमाच्या निर्मात्यांसोबत झाली आणि तिला या सिनेमात काम मिळाले.

दिव्याच्या आईचे आहे ब्युटी पार्लर
- दिव्याची आई औंरगाबाद शहरातील रमेश चौकस्थित एका ब्युटी पार्लरची संचालिका आहे.
- दिव्या सिंह मुळची औरंगाबादच्या नवीननगर प्रखंडच्या खैरा गावची रहिवाशी आहे.
- तिचे आईवडील औरंगाबादचे आहेत. तिचे वडील दिलीप सिंह अधिवक्ता आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा दिव्याची संपूर्ण मुलाखत आणि शेवटच्या स्लाईडमध्ये बघा, दिव्याच्या इश्क जुनून या सिनेमाचा ट्रेलर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...