आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीचवर हॉलिडे एन्जॉय करताना दिसली शाहिद कपूरची 'गर्लफ्रेंड', शेअर केले Bikini Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः शाहिद कपूर स्टारर 'इश्क विश्क' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला सध्या मेक्सिकोत असून येथे ती सुटीचा मनसोक्त आनंद लुटतेय. निवडक सिनेमे केल्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. आता ती ट्रॅव्हल Vlogger (video blogger) झाली आहे. शहनाजच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता ती गेल्या काही महिन्यांपासून देश-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असल्याचे तिच्या छायाचित्रांवरुन दिसतंय.

समुद्रकिनारी शहनाजने केला ब्रेकफास्ट
सध्या मेक्सिकोत हॉलिडे एन्जॉय करणा-या शहनाजने समुद्रकिनारी ब्रेकफास्ट करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. बिकिनी लूकमध्ये दिसणारी शहनाज या फोटोज विविध मेक्सिकन डिशेज खाताना दिसतेय. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "Breakfast on the beach in Mexico. Tulum today!"

'इश्क-विश्क'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण
2003 मध्ये आलेल्या 'इश्क-विश्क' या सिनेमाद्वारे शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात ती शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकली होती. 'लव का द एंड', 'डेल्ही-बेली', 'मैं और मिस्टर राइट', 'हम-तुम', 'उमर', 'आगे से राइट', 'रेडियो', 'वन लाइफ टू लिव' या सिनेमांमध्ये काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, शहनाजचे मेक्सिको आणि इतर आणखी काही Vacation Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...