आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोजपुरी सिनेमांची 'हेलन' आहे ही अॅक्ट्रेस, एका आयटम डान्ससाठी घेत 1.5 लाख रु. मानधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः भोजपुरी सिनेमांची आयटम गर्ल सीमा सिंह हिला लोक डान्सिंग क्वीन म्हणून संबोधित करतात. तिच्या डान्सिंगच्या हटके अंदाजामुळे लोक तिची तुलना वेटरन अॅक्ट्रेस हेलनसोबतसुद्धा करतात. याच कारणामुळे तिला 'भोजपुरी हेलन' म्हटले जाते. सीमाने आत्तापर्यंत 400 हून अधिक सिनेमांमध्ये आयटम नंबर केला आहे. त्यापैकी 250 हे भोजपुरी सिनेमे आहेत. एका आयटम डान्ससाठी सीमा 1 ते दीड लाख रुपये चार्ज करते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या एका हिट भोजपुरी सिनेमामुळे ती चर्चेत होती. प्रियांका चोप्राच्या सिनेमात केलंय काम...
- सीमाने याच वर्षी जून महिन्यात रिलीज झालेल्या आणि प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘बम बम बोल रहा है काशी’ या सिनेमात आयटम डान्स केला. या सिनेमात दिनेशलाल यादव मुख्य भूमिकेत होता. हे गाणे गुजरातच्या हलोलमध्ये चित्रीत झाले. कानू मुखर्जी या गाण्याचे कोरिओग्राफर आहेत. 'बुलेरो की चाबी' हे या आयटम नंबरचे बोल आहेत.

'कहां जइब राजा नजरिया लड़ाई के' होता पहिला सिनेमा...
सुनील बुबना यांचा 'कहां जइब राजा नजरिया लड़ाई के' हा सीमाचा पहिला सिनेमा होता. सीमाने भोजपुरीशिवाय राजस्थानी, मराठी, हिंदी, तामिळ, बंगाली आणि गुजराती सिनेमांमध्ये आयटम साँग केले आहेत. तिने वेस्टर्न आणि क्लासिकल डान्सचे धडे गिरवले आहेत. श्रीदेवी तिची आवडती अभिनेत्री आहे.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, सीमाने सिनेमात काम करु नये, अशी होती तिच्या वडिलांची इच्छा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...