आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधीच प्रेग्नेंट आहे \'रॉक ऑन\'च्या अॅक्टरची भावी वधू, या अभिनेत्री लग्नाआधीच होत्या प्रेग्नेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'रॉक ऑन' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता पुरब कोहली लवकरच यूकेला जाणार आहे. येथे त्याची भावी वधू लूसी पॉयटॉन वास्तव्याला आहे. लूसी सध्या प्रेग्नेंट असून लवकरच मुलीला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे लूसी आणि पुनीतचे अद्याप लग्न झालेले नाही. लग्नाआधीच ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. याविषयी पुरबने सांगितले, मी आनंदी असून लवकरच लंडनला जाणार आहे. येथे मला माझ्या पहिल्या बाळाचे स्वागत करायचे आहे. लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला विचारल्यानंतर तो म्हणाला, माझ्या मुलीच्या जन्मानंतर पुढील वर्षी लूसी आणि मी लग्न करणार आहोत.
तो पुढे म्हणाला, लूसी आणि मी एन्गेज्ड आहोत आणि बेबीसाठी ब-याच गोष्टी प्लान केलेल्या आहेत. आम्हाला ठाऊक आहे, की आमचे बाळ मुलगी आहे. कारण लंडनमध्ये लिंग परिक्षणावर बंदी नाही. मुख्य म्हणजे आम्हा दोघांनाही मुलगीच हवी होती.
विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी कपल असे आहेत, ज्यांनी लग्नाआधीच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले होते. बॉलिवूडमध्ये लग्नापूर्वी दिवस गेलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. यामध्ये श्रीदेवीपासून ते कोंकणा सेन शर्मा, सारिका या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट राहिल्या होत्या.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा अभिनेत्रींविषयी ज्यांना लग्नापूर्वीच दिवस गेले होते...