बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची लाडकी लेक कृष्णा श्रॉफ ही स्वतःच्याच टॉपलेस फोटोंच्या प्रेमात पडलेली दिसतेय. कृष्णाने पुन्हा एकदा
आपला 'टॉपलेस' फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात कृष्णाने आपले टॉपलेस फोटो सोशल वेबसाईटवर शेअर केले होते. त्यामुळे, ती अचानक प्रकाशझोतात आली होती. या फोटोंवर सारवासारव करण्याचा प्रयत्न करत जॅकी श्रॉफ यांनी 'कृष्णाने या फोटोंत टॉवेल लपेटलाय.... ती टॉपलेस नव्हती' असे म्हटले होते.
जॅकीदादांची ही लेक अद्याप सिनेसृष्टीत आली नाही, मात्र येथील बोल्डनेस ती शिकली आहे. एकामोगामाग एक टॉपलेस फोटो शेअर करण्याचा धडाकाच तिने सुरु केला आहे. त्यामुळे बोल्डनेसमध्ये ती कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा मागे नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
टॉपलेस फोटोंपूर्वी परदेशी बॉयफ्रेंडमुळे आली होती प्रसिद्धीझोतात...
कृष्णा श्रॉफ आपल्या ब्राझिलिअन प्रियकरासोबतच्या अफेअरच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीच चर्चेत आली होती. स्पेन्सर जॉनसन हे कृष्णाच्या बॉयफ्रेंडचे नाव असून जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या नात्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. गेल्यावर्षी टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती'च्या सक्सेस पार्टीमध्ये स्पेन्सर सहभागी झाला होता. कृष्णा दोन ते तीन वर्षांपासून दिवसांपासून जॉनसनला डेट करत आहे. तिने आपल्या या प्रियकरासोबतची अनेक छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरसुद्धा केली आहेत. सुत्राच्या माहितीनुसार, 'जॉनसन फुटबॉल ट्रेनर असून KOOH स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजर आहे. तो मुंबईमध्ये राहत आहे.'
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, कृष्णाने सोशल साइट्सवर शेअर केलेले टॉपलेस फोटो आणि सोबतच पाहा कोण आहे तिचा बॉयफ्रेंड.