Home »Gossip» Jacqueline Fernandez Sea Facing Mumbai Apartment, Jacqueline Fernandez Birthday Special

ड्रॉइंगपासून ड्रेसिंग रुमपर्यंत असे आहे जॅकलीनचे ड्रीम होम, PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Aug 12, 2017, 11:12 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने 11 ऑगस्ट रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला. श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिनचे वडील श्रीलंकन, आई मलेशियन तर आजी-आजोबा कॅनडाचे आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी जॅकलिन भारतात आली होती. 2009 साली 'अलादीन'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जॅकलिनने अलीकडेच मुंबईतील वांद्रा परिसरात स्वतःचा फ्लॅट खरेदी केला आहे.

सी फेसिंग आहे जॅकलिनचे नवीन घर...
जॅकलीनचे हे सी-फेसिंग अपार्टमेंट इंटेरिअर डिझायनर आशीष शाह यांनी डिझाइन केले आहे. आशीष शाह यांनी जॅकलिनच्या घराला पर्शियल लूक दिला आहे. घरातील एका कोप-यात पोल डान्ससाठी पोल लावण्यात आले आहेत. शिवाय एका रुमला ड्रेसिंग रुमचा लूक देण्यात आला आहे. यामध्ये जॅकलिनने तिचे डिझायनर शूज आणि हँड बॅग्ज ठेवल्या आहेत. ड्रॉइंग रूममध्ये एक मोठा पिंक कलरचा सोफा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक रुमला जॅकलिनच्या आवडीनुसार एक डिफरंट लूक देण्यात आला आहे.
2006 साली मिस श्रीलंकेचा किताब आपल्या नावी करणा-या जॅकलिनने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी टीव्ही रिपोर्टर म्हणून काम केले होते. मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर तिला एका न्यूज चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी मिळाली होती. 2009 साली ती भारतात आली. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यासाठी भारतात आल्यानंतर सुजॉय घोष यांनी तिला 'अलादीन' हा सिनेमा ऑफर केला. पहिल्याच चित्रपटात तिला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली खरी, पण दुर्दैवाने चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र जॅकलिनच्या अभिनयाचे कौतुक झाले. तिला खरी ओळख मिळाली ती 'किक' या चित्रपटामुळे. भारतात आल्यानंतर जॅकलिनने हिंदी भाषेचे धडे गिरवले. तिला इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी भाषेचे ज्ञान आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, जॅकलिनच्या घराचे 9 फोटोज...

Next Article

Recommended