आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline Playing Akshay Kumars Wife In Brothers

'ब्रदर्स'मध्ये पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत अक्षय-जॅकलिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय. सिनेमात हे दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत असून त्यांना एक मुलगीसुद्धा आहे.
पहिल्यांदाच जॅकलिन मोठ्या पडद्यावर आईची भूमिका वठवताना दिसणारेय. काही सीन्समध्ये ती विदाउट मेकअप दिसणार आहे.
असे म्हटले जाते, की सिनेमाचे शीर्षक अक्षयने सुचवलेले आहे. काही दिवसांपूर्वी तो मुलगा आरवसोबत परदेशात गेला होता. तेथेच त्याला हे शीर्षक सुचले आणि त्याने दिग्दर्शक करण मल्होत्राला फोन केला. करण मल्होत्राने निर्माता करण जोहरला या शीर्षकाविषयी सांगितले. सर्वांच्या पसंतीनंतर हे शीर्षक फायनल झाले. हा सिनेमा 'वॉरियर' या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. येत्या 14 ऑगस्टला सिनेमा रिलीज होणारेय.