Home »Gossip» Jai Santoshi Maa The Movie Which Created Unbreakable Record At Box Office

आतापर्यंत नाही तुटला या चित्रपटाचा रेकॉर्ड, बजेटच्या 100 पट केली होती कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Jun 18, 2017, 14:41 PM IST

मुंबई - नुकतेच हिंदी चित्रपट 'दंगल'ने देशा-परदेशात कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा 26 पट कमाई केली आहे. पण आपल्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने कमाई करणारा हा एकमेव चित्रपट नाही. आज एका अशा चित्रपटाची माहिती घेऊन आलो आहोत ज्याने त्याच्या बजेटपेक्षा 100 पट कमाई केली आहे..जाणून घ्या कोणता आहे हा चित्रपट..
- आम्ही सांगत आहोत 30 मे 1975 रोजी रिलीज झालेल्या 'जय संतोषी माँ' चित्रपटाची. केवळ 5 लाख रुपयांच्या बजेटच्या या चित्रपटाने त्यावेळी सर्वाधिक म्हणजे 5 कोटींची कमाई केली होती.
- हे ते वर्ष होते जेव्हा बॉक्स ऑफिसवर शोले आणि दिवार यांसारख्या मोठ्या चित्रपट रिलीज झाले होते. पण कोणत्याही मोठ्या स्टारकास्टविना 'जय संतोषी माँ' चित्रपटाने रुपेरी पडद्यावर गोल्डन ज्युबली म्हणजेच यशस्वी 50 आठवडे पूर्ण केले होते.
- विजय शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला होता. त्याच अनिता गुहा, कनन कौशल, भारत भूषण आणि आशीष कुमार यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.
वाचा पुढच्या स्लाईडवर, थिएटरच्या बाहेर बसलेल्या व्यक्तिने कमविले होते 1.70 लाख रुपये..

Next Article

Recommended