आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरच्या भावासोबत दिसली जान्हवी कपूर, मीडियाला पाहून बदलला रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसून आली. रेड टॉप आणि जीन्स घातलेल्या जान्हवीसोबत ईशान खट्टर. मीडियाला पाहताच दोघांनी आपापला रस्ता बदलला आणि एकमेकांपासून दूर गेले. 
 
याअगोदरही जान्हवीला ईशानसोबत 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चित्रपटात पाहण्यात आले होते. अशी चर्चा आहे, की करण जोहर या दोघांना मराठी चित्रपट 'सैराट'च्या हिंदी रिमेकमध्ये घेणार आहेत. पण याबद्दल अजून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. 
 
डेटिंगच्या बातम्यांनी नेहमी चर्चेत असते जान्हवी कपूर..

जान्हवीने अजून चित्रपटांमध्ये पदार्पण केलेले नाही. असे असुनही ती तिच्या स्टाईल आणि अफेअरच्या बातम्यांनी नेहमी चर्चेत असते. मागील वर्षी तिच्याबद्दल अशी बातमी समोर आली होती, की ती सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारियाला डेट करत आहे. शिखरला स्मूच करतानाचाही तिचा एक फोटो वायरल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी सध्या अक्षत रंजनला डेट करत आहे. कपूर फॅमिलीसोबत अक्षत नेहमीच जान्हवीसोबत दिसून येतो. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, जान्हवीचे अजून काही फोटो..
बातम्या आणखी आहेत...