आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभला लंबू-लंबू म्हणून चिडवत होत्या जयाच्या मैत्रिणी, अशी आहे लव्ह-स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस जया बच्चन 9 एप्रिलला 69 वर्षांच्या होतील. 1971 मध्ये आलेल्या 'गुड्डी' या फिल्ममधून जयाने बॉलीवुड करियरची सुरुवात केली. जया बॉलीवुडमधील सर्वात यशस्वी अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. जयाला त्यांच्या पहिल्या फिल्मसाठी बेस्ट अॅक्ट्रेसच्या फिल्मफेयर अवॉर्डसाठी नॉमिनेट केले होते. अमिताभला लंबू लंबू म्हणून चिडवत होत्या जयाच्या मैत्रिणी...
जया बच्चन जेव्हा पुण्यात शिक्षण घेत होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या 'सात हिंदुस्थानी' (1969) या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने पुण्यात आले होते. जया त्यांना ओळखत होती. त्याकाळात जया आणि अमिताभ यांची पहिली भेट झाली होती. 
 
अमिताभ यांच्यावर जडला जीव -
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'गुड्डी' या सिनेमासाठी अमिताभ बच्चन आणि जया यांना कास्ट केले होते. मात्र काही कारणास्तव अमिताभ यांना या सिनेमातून बाहेर करण्यात आले. फिल्म इंडस्ट्रीतील जाणकार सांगतात, की या घटनेनंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याविषयी प्रेम निर्माण झाले होते. 
 
लहानश्या 'गुड्डी'चा उंच नवरदेव
ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी या सिनेमाच्या सेटवर जया आणि अमिताभ यांची ओळख करुन दिली होती. त्यानंतर  1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया जंजीर या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमाचे शुटिंग सुरु असतानाच्या काळात या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सांगितले जाते, की अमिताभ आणि जया या सिनेमाच्या शुटिंगनंतर सुटी घालवण्यासाठी परदेशात जाऊ इच्छित होते. मात्र अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लग्न केल्याशिवाय बाहेर जायचे नाही, असा आदेश दिला. त्यानंतर अगदी साध्या समारंभात अमिताभ आणि जया लग्नगाठीत अडकले. 
 
जयाने या फिल्ममध्ये केले आहे काम
'गुड्डी' नंतर जयाने अनेक फिल्म केल्या. यामध्ये काही हिट होत्या तर काही फ्लॉप होत्या. जयाने  'उपहार' (1971), 'जवानी दीवानी' (1972), 'बावर्ची' (1972), 'परिचय' (1972),'कोशिश' (1972) सोबतच अनेस फिल्ममध्ये काम केले. यानंतर 1972 मध्ये आलेली फिल्म  ‘कोशिश’ नंतर ऋषिकेश मुखर्जी जयाचे आवडते दिग्दर्शक बनले. यानंतर जयाने त्यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म 'अभिमान' (1973), 'मिली' (1975) आणि 'चुपके चुपके'(1975) सारख्या फिल्म केल्या. 1992 मध्ये जया यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या फिल्म करियरमध्ये जयाला 8 वेळा फिल्मफेयर पुरुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा जया बच्चनचे निवडक 16 PHOTOS...

 
बातम्या आणखी आहेत...