आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaya Bachchan Is A Angry Women, Read Some Controversial Statement

'अँग्री मॅन'ची 'अँग्री वुमन', जाणून घ्या जया यांना कधी-कधी आला राग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन आज 68वा वाढदिवस साजरा करत आहेत. गतकाळातील लोकप्रिय अभिनेत्री जया यांनी अनेक हिट सिनेमांत काम केले आहे. जया या खूप हट्टी असल्याचेसुध्दा म्हटले जाते. त्यांना रागीट असून एखाद्या गोष्टीवर पटकन रिअॅक्ट होतात.
अमिताभ बच्चन रिल लाइफमध्ये 'अँग्री मॅन' म्हणून ओळखले जातात. परंतु रिअल लाइफमध्ये त्यांची पत्नी जया बच्चन 'अँग्री वुमन' आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार
नाही. अनेकदा माध्यमांना आणि पत्रकार परिदषेत अनेक पत्रकारांना त्यांच्या रागाचा सामना करावा लागला आहे.
जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्याने अनेकदा अमिताभ यांना त्या प्रकरणात मध्यस्ती करावी लागते. वादग्रस्त वक्तव्यामुळेच बच्चन आणि गांधी कुटुंबात ताणाव निर्माण झाला होता. एवढेच नव्हे, जया यांच्या एका वक्तव्याने बच्चन कुटुंबीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निशाण्यावर आले होते.
एकदा सार्वजनिक ठिकाणी एका पत्रकाराने त्यांना अमिताभ यांच्या कर्करोगाविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा जया यांनी त्याची कॉलर पकडली होती. अमिताभ यांनी जया यांच्या या कृत्यानंतर माफी मागितली होती. त्यावेळी जया यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांच्याशी निगडीत प्रश्नावर सांगितले होते, की तुम्ही आपले म्हणणे मांडू शकता तर माफी का मागताय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या केव्हा-केव्हा जया यांना आला राग...