आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्रच्या या चित्रपटात हिरोईन होत्या जयललिता, सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सोमवारी रात्री चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दक्षिणेतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील राजकारणावर दबदबा होता. यशस्वी राजकारणी असण्याआधी त्या एक यशस्वी अभिनेत्री होत्या. दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले होते.
अम्मा नावाने प्रसिद्ध असलेल्या 68 वर्षीय जयललिता यांनी तामिळबरोबरच तेलुगु, आणि कन्नड भाषांतील140 हून अधिक चित्रपट केले. हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केली होती. 1962 मध्ये सर्वप्रथम जयललिता बॉलीवूडपटांत झळकल्या. किशोर कुमार आणि साधना यांच्या 'मन-मौजी' चित्रपटात त्यांनी एक छोटीसी भूमिका केली होती.
या चित्रपटांत त्यांचा एक डान्स होता त्यात जयललिता भगवान कृष्णाच्या गेटअपमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. पण मोठी भूमिका असलेला त्यांचा हिंदी चित्रपट होता 1968 मध्ये प्रदर्शित जालेला टी प्रकाश राव यांचा चित्रपट 'इज्जत'. या चित्रपटात जयललिता यांनी झुमकीची भूमिका केली होती. धर्मेंद्र आणि तनुजा यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इज्जत चित्रपटातील जयललिता आणि धर्मेंद्र यांचे काही फोटो आणि जयललितांच्या दुःखावर सेलिब्रिटींचे ट्वीट्स अखेरच्या स्लाइडवर पाहा, इज्जत चित्रपटातील जयललितांवर चित्रित करण्यात आलेले एक गाणे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...