आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-कॅटचे संबंध 'जग्गा जासूस' यशस्वी झाल्यास सुधारतील?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफने एक नवा फ्लॅट घेतला आहे. त्याच्या कलशपूजेच्या दिवशी तिने बॉलिवूडमधील तिच्या जवळच्या माणसांना आमंत्रित केले आहे. सलमान खान आणि त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांना निमंत्रण पाठवले आहे. तिच्या 'जग्गा जासूस'च्या सर्व टीमलाही तिने निमंत्रण पाठवले आहे, मात्र त्यातील मुख्य कलाकार रणबीर कपूरला मात्र तिने या कार्यक्रमाला बोलावले नाही. रणबीर आणि कॅटचे कधीकाळी खूप जवळचे संबंध होते. त्या दोघांनी एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. 'वेक अप सिड'मधील नायक नायिकेप्रमाणे या दोघांनी हा फ्लॅट एकदम सुंदर सजवलाही होता. आता मात्र तिला रणबीरचे काही देणेघेणे नाही. आयुष्य आणि चित्रपटात अनेक गोष्टी ठरवल्याप्रमाणेच घडतात. 
 
कतरिना कैफ स्वत:बाबत खूप सजग आहे. काश्मिरी वडील आणि ब्रिटनची आई असलेल्या कतरिनाचा जन्म बँकॉकमध्ये झाला. तिने अमेरिकेत दोन मजली बिल्डिंग खरेदी केली आहे. दुसऱ्या मजल्यावर आपला परिवार राहील आणि तळमजला भाड्याने देऊन त्यावर तिचा परिवार गुजराण करील असे तिचे धोरण आहे. आपल्या आचार-विचारांनी ती पक्की भारतीय असल्यासारखी वाटते. अमेरिकेतील लोक खूप हुशार असतात. मुलगा कमवण्यायोग्य झाल्यावर तो लगेच स्वत:चे घर घेतो. लग्न केल्यानंतरही मेल, मेसेज किंवा फोन कॉल्सवर त्याचे कुटुंबीयांशी संबंध कायम असतात. अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महिला उमेदवाराचा पराभव झाला. एका महिलेच्या अधिकाराखाली राहणे त्यांना पसंत नाही. निवडणुकीत उभी असलेली महिला उमेदवाराचे रुस आणि तेथील साम्यवादाशी संबंध असल्याचा प्रचार त्यावेळी करण्यात आला. आता जो उमेदवार निवडणुकीत विजयी झाला त्याचेच रुसशी संबंध असल्याचे पुरावे समोर येत आहेत. 
 
पुढे वाचा, पुढे वाचा, 'जग्गा जासूस'चा रणबीर सह-निर्माता... 
बातम्या आणखी आहेत...