आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी कमावणा-या 'सैराट'च्या रिमेकमधून डेब्यू करतेय श्रीदेवीची मुलगी, येथे होणार शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपुरः अभिनेत्री श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूरच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग लवकरच राजस्थानच्या उदयपूर येथे सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वीच लोकेशन बघण्यासाठी जान्हवी उदयपूरला येऊन गेली होती. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये हा चित्रपट तयार होत असून स्वतः करण जोहर येत्या 18 नोव्हेंबरला उदयपूरमध्ये दाखल होणार आहे. 

शाहिदच्या भावासोबत झळकणार जान्हवी...
- मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून जान्हवी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जान्हवीसोबत शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशांत खट्टरची निवड करण जोहरने लीड रोलसाठी केली आहे.  
- अलीकडेच जान्हवी आणि ईशांत या दोघांनीही उदयपूरमध्ये चित्रपटाचे लोकेशन पाहिले. शूटिंगसाठी येथे येणारी चित्रपटाची संपूर्ण टीम उदयपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये राहणार आहे.
- 'सैराट' हा मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट असून गेल्यावर्षी रिलीज झाला होता. 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे.
- हिंदीत हा चित्रपट शशांक खेताना दिग्दर्शित करणार आहे.

उदयपूरमध्ये शूट होणार चित्रपटाचा महत्त्वाचा भाग...
- चित्रपटात ईशांत दलित तरुणाची तर जान्हवी ब्राह्मण तरुणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  
- उदयपुरच्या ग्रामीण परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.
- विशेष म्हणजे ईशांत आणि जान्हवीवर चित्रपटातील गाणी येथेच चित्रीत होणार आहेत.
- रेडिसन ब्लूच्या स्वाती अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबरपासून चित्रपटाची टीम या हॉटेलमध्ये वास्तव्याला असणार आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झालेल्या जान्हवीची खास छायाचित्रे..  
बातम्या आणखी आहेत...