श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर चित्रपटात पदार्पण करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. मागे तिने जिम जॉईन केल्याचीही बातमी आली होती. आता नुकतेच ती एका डान्स क्लासच्या बाहेर दिसली. आपल्या डेब्यू चित्रपटासाठी ती डान्स शिकत असल्याची चर्चा आहे.
'सैराट'च्या हिंदी रिमेकमध्ये ती शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत येणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी जान्हवी करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ इयर-2' मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती.