आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sridevi's Daughter Jhanvi To Make Her Debut From South Indian Film

श्रीदेवीची लेक झळकणार रुपेरी पडद्यावर, बॉलिवूड नव्हे दाक्षिणात्य सिनेमातून घेणार एंट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिर्घकाळापासून चर्चेत आहे. आता बातमी अशी आहे, की ती लवकरच फिल्म करिअरची वाटचाल सुरु करणार आहे. जान्हवी बॉलिवू़ड नव्हे चक्क दाक्षिणात्य सिनेमांतून पदार्पण करत आहे. 'बजरंगी भाईजान'चे लेखक विजयेंद्र यांची स्क्रिप्ट जान्हवी कपूरला देण्यात आली आहे.
"ओके कनमनी'' या सिनेमातून पदार्पण करणारा डिलकर सलमान यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तसे पाहता, 'हवा-हवाई' गर्ल श्रीदेवीची मुलगी जान्हवीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली नाहीये तरीदसुध्दा ती एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. जान्हवी सोशल नेटवर्किंग साइट्सवर खूप अॅक्टिव्ह राहते. ती नेहमी स्वत:चे फोटो पोस्ट करत असते.
मागील काही दिवसांपूर्वी जान्हवीची लेट नाइट पार्टी एन्जॉय करतानाची छायाचित्रे समोर आली होती, असे नाही. त्यापूर्वीही काही मैत्रिणींसोबत पार्टीत धमाल मस्ती करतानाची तिची छायाचित्रे प्रकाशित झाली होत. एकंदरीतच काय तर या मॅडमला लेट नाइट पार्टीत धमाल करणे पसंत असल्याचे दिसून येते. जान्हवीला ग्लॅमरस आयुष्य आणि लाइमलाइटमध्ये राहणे आवडते, असेच तिच्या सर्व छायाचित्रांतून दिसून येते. आता जान्हवी रुपेरी पडद्यावर कशी आणि किती आकर्षक दिसते हे येणारा काळच सांगेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता, जान्हवीचे ग्लॅमरस फोटो...