आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan And Other Celebs Who Passed Away In Early Age

कमी वयातच जिया, दिव्यासह या 9 सेलेब्सने घेतला जगाचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'निशब्द', हाउसफुल' आणि 'गजनी'सारख्या सिनेमांत काम केलेल्या जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988ला न्यूयॉर्कमध्ये झाला होता. परंतु आज ती आपल्यात नाही. 3 जून 2013ला वयाच्या 25व्या वर्षी जियाने जगाचा निपोर घेतला. तिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता. जियाने आत्महत्या केल्याचे आधी मानले जात होते, मात्र जियाच्या आई सूरज पांचोलीवर माझ्या मुलीचा खून केल्याचा आरोप लावल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले.
अनेक सेलेब्सने कमी वयातच घेतला जगाचा निरोप...
जिया खानच नव्हे तर बॉलिवू़डमध्ये अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी कमी वयात जगाला अलविदा म्हटले. कुणी 19व्या वर्षी तर कुणी 25व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या पॅकेजच्या माध्यमातून एक नजर टाकूया अशाच काही सेलिब्रिटींविषयी जे 40 वर्षेसुध्दा जगू शकले नाहीत.
दिव्या भारती...
एकेकाळी बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये सामील होणा-या दिव्या भारती मुंबईच्या वार्सोवा स्थित तुलसी अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. आजसुध्दा तिच्या मृत्यूचे रहस्य एका बंद पेटीत दडल्यासारखे आहे. कमी वयातच नाव कमवणा-या अभिनेत्रींमध्ये दिव्याचे नाव घेतले जात होते. बातम्यांनुसार, 10 मे 1992मध्ये तिने दिग्दर्शक साजिद नाडियाडवालासोबत लग्न केले. लग्नाला वर्षसुध्दा झाले नव्हते, की दिव्याच्या मृत्यूची बातमी ऐकायला आली. दिव्याचे निधन वयाच्या 19व्या वर्षी झाले. कमी वयातच जगाचा निरोप घेणा-यांमध्ये केवळ दिव्याच नव्हे बॉलिवूडच्या इतरही अभिनेत्री सामील आहेत. दिव्या भारतीने तेलगु सिनेमातून जरी करिअरला सुरुवात केली असली तरी तिला बॉलिवूडमध्ये हवे तेवढे यश मिळाले होते. दोन्ही भाषांमध्ये तिने 20 सिनेमे केले. यामध्ये, 'दीवाना', 'गीत' 'दिल ही तो है', 'दिल आशना है' आणि 'रंग' हे सिनेमे सामील आहेत. हे सर्व सिनेमे तिने 1991 ते 1993 या काळात केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही सेलेब्सविषयी...