आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Johnny Lever's Daughter Jamie To Make Her Bollywood In Kis Kisko Pyar Karoon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

In Pics: ही आहे जॉनी लिव्हरची मुलगी, मार्केटिंग क्षेत्र सोडून ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटक्षेत्रात आपल्या आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा वारसा फार पूर्वीपासून चालत आला आहे. आता हाच कित्ता गिरवत प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर हिनेही अभिनेय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
जॉनी लिव्हर यांनी आपली मुलगी जेमी लिव्हरला अनेक सूचना देत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास परवानगी दिली आहे. टीव्ही शोपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी जेमी कपिल शर्मासोबत 'किस किस को प्यार करूं' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील करिअरचा श्रीगणेशा करत आहे. आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत आलेल्या कपिल शर्माचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. अब्बास-मस्तान यांनी जेमीचा व्हॉट‌्सअॅपवर एक व्हिडिओ बघून आपल्या ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात तिला संधी दिली. यामध्ये जेमी एक विनोदी भूमिका करत आहे.
कॉमेडी सर्कसमध्ये केले काम...
सोनी चॅनेलवरील 'कॉमेडी सर्कस के महाबली'मध्ये जेमी झळकली आहे. पदार्पणातच तिने विनोदीबुद्धीची चुणूक दाखवून दिली. या कार्यक्रमात तिच्यासोबत प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुरेश मेनन आणि मुबीन हे कलाकार होते. या कार्यक्रमामध्ये जेमीने तीन पात्र वठविले होते.
लंडनहून घेतले शिक्षण..
जेमीने लंडनहून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये तिने दोन वर्षे मार्केटिंगचा जॉबही केला. अभिनय क्षेत्रातील पदार्पणाविषयी जेमी म्हणते, ''मला विनोद कळतो तो केवळ माझ्या वडिलांमुळेच. वडिलांना लहानपणापासून स्टेज शो करताना पाहात आलेय. आपणही त्यांच्यासारखेच काहीतरी करायला हवे असे सतत वाटत होते, म्हणूनच मी या क्षेत्रात प्रवेश केला.''
गायिकासुद्धा आहे जेमी
जेमी एक गायिका असून तिला आशा भोसलेंची मिमिक्री करणे जास्त आवडते. त्याचबरोबर इला अरुण, हेमा मालिनी, करीना कपूर यांचीदेखील मिमिक्री ती करते. शाळकरी वयातच तिच्या संगीत शिक्षणाची सुरुवात झाली. तिला शास्त्रीय संगीत शिकवण्यासाठी घरी गुरुजी येत. जेमीला गझल ऐकणे खूप आवडते. तिने ख्रिस्ती गाण्यांच्या काही अल्बममध्ये गायलेही आहे. गाण्याबरोबरच तिला नृत्याचीही खूप आवड आहे. तिने आपल्या वडिलांसोबत अनेक लाइव्ह शो केले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जेमी ग्लॅमरस आणि सोबतच खट्याळ अंदाज...
नोटः जेमीची सर्व छायाचित्रे तिच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.