आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टायगर श्रॉफला ट्रेनिंग देतो हा ग्रामीण तरुण, अनाथाश्रमात झाला मोठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बेफिक्रा' गाण्याच्या शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीसोबत विक्रम सवाइन - Divya Marathi
'बेफिक्रा' गाण्याच्या शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीसोबत विक्रम सवाइन
भोपाळ: 'फ्लाइंग जट' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता टायगर श्रॉफ 7 जुलैला भोपाळमध्ये येणार आहे. या सिनेमात टायगर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे आणि प्रेक्षकांसाठी त्याच्या अॅक्शन सीन्सची मेजवाणी असेल. टायगरच्या या फिटनेसमागे ज्या ट्रेनरचा हात आहे, तो एका छोट्या गावातील रहिवासी आहे. एका अनाथाश्रमातून आयुष्याची सुरुवात करणारा विक्रम सवाइन टायगर श्रॉफचा पर्सनल डान्स आणि जिमनॅस्टिक ट्रेनर आहे.
अनाथाश्रमातून कसा पोहोचला बॉलिवूडमध्ये...
- विक्रम ओडिसाच्या गंजाम जिल्ह्याच्या अंतारीगाम नावाच्या एका छोट्या गावात राहत होता.
- त्याला वडील असूनदेखील तो धाकट्या भावासोबत अनाथाश्रमात राहत होता.
- विक्रम सांगतो, की तो 9 वर्षांचा असताना एका गार्डनमध्ये काम करण्याचे 400 रुपये महिना मिळायचा. त्यातून त्याच्या तीन वर्षांच्या भावासाठी दूध आणि खाण्याचा वस्तू खरेदी करत होता.
- काही वर्षांनी विक्रम जास्त पैसे कमावण्यासाठी गुजरातच्या सूरतला गेला. तिथे तो भरतकाम शिकला.
- सूरतमध्ये त्याला 1300 रुपये मिळायला लागले होते. आपल्या कमाईतील अर्धा वाटा ठेवून बाकीचे पैसे तो भावाला गावाकडे पाठवत होता.
- त्यानंतर 2009मध्ये विक्रम मुंबईला गेला आणि दक्षिण मुंबईमध्ये कार धुण्याचे काम करू लागला.
- त्याच्यासोबत काम करणारा एक ड्रायव्हर प्रत्येक रविवारी जुहू बीचला जात होता. एकेदिवशी तो विक्रमलासुध्दा सोबत घेऊन गेला.
- बीचवर विक्रमने काही मुलांना जिमनॅस्टिक करताना पाहिले. त्याच्याही मनात आले, की आपणही त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करावी.
- त्यानंतर तो प्रत्येक सुटीच्या दिवशी जुहू बीचवर जायचे आणि जिमनॅस्टिकचा सराव करू लागला. एकेदिवशी विक्रम प्रॅक्टिस करत असताना टायगर श्रॉफने त्याला पाहिले आणि विक्रमचे आयुष्यच पालटले.
टायगर श्रॉफने ऑफर केली ट्रेनरची नोकरी...
- टायगर या कमी वयाच्या मुलाच्या कौशल्य आणि हुशारीवर प्रभावित झाला. तोसुध्दा विक्रमसोबत सराव करू लागला.
- त्यादिवसांत टायगरचा 'हिरोपंती' रिलीजसाठी तयार होता. काही दिवस विक्रमसोबत सराव केल्यानंतर टायगरने त्याने ट्रेनरची नोकरी ऑफर केली.
- विक्रमला नोकरी मिळाली, परंतु त्याच्या भाषेची अडचण होती. त्याला हिंदी आणि इंग्लिश येत नव्हती. परंतु टायगरने त्याचे म्हणणे समजून घेतले.
- टायगरने त्याला एक मोबाईल आणि सिम खरेदी करून दिले आणि तेव्हा तो भाषा शिकू लागला.
- हळू-हळू विक्रम हिंदी आणि इंग्लिश शिकला. त्याला आता भाषेची काहीच अडचण भासत नाही.
- टायगरने त्याला यूट्यूब पाहणे आणि व्हिडिओ सिलेक्ट कसे करायचे हे शिकले. त्याच्या मदतीने विक्रमला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
- जिमनॅस्टिकच्या ट्रेनिंगनंतर डान्ससुद्धा शिकू लागला. फ्लॅक्सिबल बॉडी असल्याने त्याला डान्स शिकण्यात अडचणी आल्या नाहीत. त्यासाठी तो ट्रेनिंग घेत आहे.
टायगरशिवाय या बॉलिवूड स्टार्सने देतोय ट्रेनिंग...
- टायगरच्या माध्यमातून विक्रमची भेट सूरज पांचोलीसोबत झाली. विक्रम सूरजलासुध्दा ट्रेनिंग देतो.
- सध्या विक्रम टायगरशिवाय सूरज, अथिया शेट्टी आणि सैषा सहगलचा ट्रेनर आहे.
- विक्रम आपल्या यशाचे सर्व श्रेय टायगर श्रॉफला देतो आणि त्याला देव मानतो.
भावाला एमबीएला दिला प्रवेश...
- आता इतकी कमाई केल्यानंतर तो घरी पैसे पाठवतो.
- त्याने गावात जमीन खरेदी केली आहे.
- धाकट्या भावाला एमबीएला प्रवेश मिळवून दिला.
- आता विक्रम टायगरच्या पर्सनल ट्रेनिंग टीमसोबत परदेशी दौ-यावरसुद्धा जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्ससोबत विक्रमचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...