आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारवेळा कबीर बेदी चढलाय बोहल्यावर, परवीन बाबीसोबतही जुळले होते नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे (वरती) पहिली पत्नी प्रोतिमा, (खाली) तिसरी पत्नी निकी बेदीसोबत. उजवीकडे (वरती) दूसरी पत्नी सुसैन हम्फ्रेससोबत, (खाली) चौथी पत्नी परवीनसोबत कबीर बेदी - Divya Marathi
डावीकडे (वरती) पहिली पत्नी प्रोतिमा, (खाली) तिसरी पत्नी निकी बेदीसोबत. उजवीकडे (वरती) दूसरी पत्नी सुसैन हम्फ्रेससोबत, (खाली) चौथी पत्नी परवीनसोबत कबीर बेदी
मुंबई- 16 जानेवारी 1946मध्ये जन्मलेला कबीर बेदी 70 वर्षांचा झाला आहे. कबीर इंडस्ट्रीच्या अशा स्टार्सपैकी एक आहे, जे स्वत:च्या अंदाजात आयुष्य जगतात. मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात करणारा कबीर बेदी आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहिला. त्याने तब्बल 4 विवाह केले आहेत आणि तीनवेळा त्याचे घटस्फोट झाले आहेत. कबीरचे नाव परवीन बाबीसोबत जुळले होते.
प्रोतिमा बेदीसोबत झाले पहिले लग्न...
कबीर बेदीचे पहिले लग्न डान्सर प्रोतिमा बेदीसोबत 1969मध्ये झाली होती. प्रोतिमा-कबीर यांना मुलगी पूजा आणि मुलगा सिध्दार्थ ही दोन मुले आहेत. प्रोतिमाने कबीरपासून विभक्त झाल्यानंतर सांगितले होते, की ती कबीरसारखे दुस-या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही. यादरम्यान मुलगा सिध्दार्थच्या आत्महत्येने कबीर आणि प्रोतिमा यांना मोठा धक्का बसला. काही काळानंतर प्रोतिमाचेसुध्दा एका अपघातात निधन झाले.
परवीन बाबीसोबत होते अफेअर...
कबीरचे पहिले लग्न डान्सर प्रोतिमा बेदीसोबत झाले होते, दोघांना मुलगी पूजा आणि मुलगा सिध्दार्थ ही दोन मुले आहेत. कबीरचा मुलगा शिजोफ्रिनिया नावाच्या आजाराने त्रस्त होता आणि 1997मध्ये त्याने आत्महत्या केली. प्रोतिमापासून घटस्फोट घेतल्यानंतर कबीर जवळपास तीन वर्षे परवीन बाबीसोबत नात्यात आणि लिव्ह-इनमध्ये होता. दोघांच्या अफेअरने बरीच चर्चा एकवटली होती. मात्र, कबीर यांनी परवीनसोबत लग्न केले नाही.
ब्रिटीश फॅशन डिझाइनरसोबत केले दुसरे लग्न...
परवीन बाबीनंतर कबीरचे नाते ब्रिटीश फॅशन डिझाइनर सुसैन हम्फ्रेससोबत जुळले. त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले. दोघांना एक मुलगा एडम बेदी आहे, तो एक इंटरनॅशनल मॉडेल आहे. एडम 'हॅलो कौन है?'मधून बॉलिवूडमध्ये आला होता. कबीरच्या दुस-या लग्नाचाही अंत घटस्फोटाने झाला.
निक्कीसोबतही तुटले नाते...
1990च्या दशकात कबीरने तिसरे लग्न टीव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर निक्कीसोबत केले आणि 2005मध्ये दोघांचे नाते संपुष्टात आले. दोघांना एकही आपत्य नाहीये.
59व्या वर्षी केले परवीनसोबत लग्न...
कबीरने निक्कीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल परवीन दुसांजसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. दोघांचे लग्ने झाले. विशेष म्हणजे, कबीर यांची चौथी पत्नी परवीन (वय जवळपास, 40) त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा (44 वय) चार वर्षांनी लहान आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कबीर खानच्या फॅमिलीचे फोटो...