आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करणच्या मुलांचा फोटो पाहून काजोलने केले असे काही, पुन्हा मैत्री होण्याची फॅन्सला आशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक करण जोहरने रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या जुळ्या मुलांचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी सर्वांकडून करणवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करण जोहरचे मुले इतके सुंदर आहेत की, बॉलिवूड इंडस्ट्रीसह करणचे फॅन्स अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडले आहेत. यावेळी करणची मैत्रीण काजोलनेही फोटोला लाईक करुन प्रेक्षकांना चकीत केले. यानंतर करणनेही ट्वीटरवर तिला पुन्हा फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.
 
काजोल आणि करण यांच्या मैत्रीत सध्या कटुता असून ते एकमेकांशी बोलत नाही. अशावेळी काजोलने करणने शेअर केलेल्या मुलांच्या फोटोवर लाईक केले आहे. काजोलच्या या कृतीने करणसोबत तिचे संबंध सुधारतील काय अशी चर्चा आहे. 
 
करण जोहर रुही आणि यश या दोन जुळ्या मुलांचा पिता आहे. सरोगसीद्वारे करणने या मुलांना जन्म दिला आहे. करणचे हे दोघे मुले प्रीमॅच्युअर असल्याने त्यांना काही दिवस हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आले होते. आता त्यांना हॉस्पीटलमधून घरी आणले आहे. तेव्हापासून यांना भेटासला लोकांची रीघ लागली आहे. आता करणच्या मुलांना भेटायला काजोल येणार की नाही यावर फॅन्स उत्सुक आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, नेमके काय घडले होते की करण आणि काजोल यांच्या मैत्रीत आली कटुता..
बातम्या आणखी आहेत...