आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: आतून असे दिसते 'कलियों का चमन' अॅक्ट्रेसचे घर, गोव्यात आहे दुसरे घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'कलियों का चमन' या म्युझिक व्हिडिओतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मेघना नायडू मुंबईतील गोरेगांव येथे तिच्या आईवडिलांसोबत वास्तव्याला आहे. येथे तिचे स्वतःचे एक लॅविश डुप्लेक्स आहे. divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये अशाच एका सुंदर घराचे नेहमीच स्वप्न बघितल्याचे मेघनाने सांगितले. 6 वर्षांपूर्वी तिचे हे स्वप्न सत्यात कसे उतरले, हेसुद्धा मेघनाने सांगितले.
 
वयाच्या 23 व्या वर्षी खरेदी केले होते पहिले घर...
मेघनाने आम्हाला सांगितले, "मी माझे हे पहिले घर वयाच्या 23 व्या वर्षी खरेदी केले होते. त्यावेळी माझा 'कलियों का चमन' हा व्हिडिओ रिलीज झाला होता. व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर सहा महिन्यांनी मी अंधेरी परिसरात घर खरेदी केले होते. माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला होता, की पैसे बँकेत जमा करण्याऐवजी त्यातून घर खरेदी करुन इन्व्हेस्ट करायला हवे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मुंबईत घर खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे हवे अशतात. त्यामुळे पहिले घर खरेदी करताना मला लोन घ्यावे लागले होते. ते लोक फेडण्यासाठी मला दिवसरात्र काम करावे लागले होते. आता मी गोव्यात दुसरे घर घेतले आहे. त्यासाठी पहिले घर मला विकावे लागले."
 
मेघनाने तिच्या या डुप्लेक्सविषयी सांगितले, की जिथे ती सध्या वास्तव्याला आहे. ती म्हणाली, "6 वर्षांपूर्वी मी हा थ्री अँड हाफ डुप्लेक्स खरेदी केला. हे घर 1800 स्वे. फूट आहे. हे घर खरेदी करतानासुद्धा मला लोन घ्यावे लागले होते. आता पूर्ण लोन फेडून झाले आहे. मी या बिल्डिंगमध्ये यासाठी घर घेऊ इच्छित होते, कारण येथे इंडस्ट्रीतील माझे बरेच फ्रेंड्स राहतात. मी 2BHK घराच्या शोधात होती. मात्र नंतर मला हा डुप्लेक्स खूप पसंत पडला. आणि फायनली मी तो खरेदीही केला."
 
स्वतः केले डिझाइन...
घरातील प्रत्येक कोपरा मेघनाने स्वतः डिझाइन केला आहे. तिच्या मते, इंटेरिअरवर होणारा खर्च हा घराच्या किंमती एवढा होता. ती सांगते. "घराचे इंटेरिअर मी स्वतः डिझाइन केला आहे. मात्र खर्च थोडा अधिक झाला. टाइल्सपासून ते फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे मी स्वतः लक्ष दिले. मला इंटेरिअर डिझायनिंगची थोडीही कल्पना नव्हती. घरातील जास्तीत भाग हा डार्क वूड्स आणि व्हाइट वॉल्सने डिझाइन केला आहे. याकाळात मला जी गोष्ट आवडली, ती मी खरेदी केली होती. किचनपासून ते बेडरुमपर्यंत प्रत्येक कोप-याला मी असे सजवले आहे, जे बघून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल.
 
टीव्ही आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस आहे मेघना
मेघना डान्सरसोबत टीव्ही आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस आहे. तिने बॉलिवूडमध्ये 'हवस', 'AK47', 'रिवाज', 'इश्क दीवाना' आणि 'क्या कूल हैं हम 3' या सिनेमांत काम केले. टीव्हीवर ती 'फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी' आणि 'डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोजसोबत 'जोधा अकबर', 'अदालत' आणि 'ससुराल सिमर का' या फिक्शन शोजमध्ये झळकली आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, मेघनाच्या घराचे इनसाइड PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...