आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalpana Item Queen Of The 80s, Here's What She's Up To These Days

16 वर्षांत बदलला या फेमस आयटम गर्लचा लूक, अमजद खानसोबत जुळले होते सूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या सिनेमातील 'परदेशी...' हे गाणे नक्कीच तुमच्या लक्षात असेल. या सिनेमातील एका गाण्यात अभिनेत्री कल्पना अय्यर झळकली होती. कल्पना ऐंशीच्या दशकातील हिट आयटम गर्ल होती. शिवाय अनेक सिनेमांमध्ये तिने खलनायकी भूमिका वठवल्या आहेत.
अमजद खानसोबत जुळले होते नाव
कल्पना अय्यरला मिथून चक्रवर्ती स्टारर 'डिस्को डान्सर' या सिनेमातील 'कोई यहाँ नाचे नाचे' या गाण्यातून प्रसिद्धी मिळाली होती. असे म्हटले जाते, की बॉलिवूड अभिनेते अमजद खानसोबत कल्पना अय्यरचे सूत जुळले होते. मात्र हे नाते पुढे सरकू शकले नाही.
16 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री आता दुबईत सेटल झाली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिने आपल्या फिल्मी प्रवासाविषयी सांगितले. divyamarathi.com वाचकांना तिच्या या मुलाखतीविषयी सांगत आहे.
राजश्री प्रॉडक्शनने दिली होती पहिली संधी
सत्तरच्या दशकात मॉडेलिंगद्वारे करिअरला सुरुवात करणारी कल्पना अय्यर 1978 साली मिस इंडिया स्पर्धते फस्ट रनरअप ठरली होती. त्यानंतर तिने ग्लॅमर वर्ल्डमध्ये एन्ट्री घेतली. याकाळात तिला राजश्री प्रॉडक्शनच्या 'मनोकामना' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. या सिनेमात ती ग्लॅमरस रुपात झळकली होती.
बॉलिवूड सोडून आता दुबईत स्थायिक
1999 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम साथ साथ है' या सिनेमात कल्पना शेवटची झळकली होती. त्यानंतर ती दुबईत सेटल झाली.
आजही आहे सिंगल
लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री आजही सिंगल आहे. मात्र याचे तिला दुःख नाही. कल्पना सांगते, ''मी लग्न का केले नाही, याचे उत्तर कुणालाही देऊ शकत नाही. कदाचित लग्न करण्याची माझ्यात हिंमत नव्हती. नाती जोडणे हे कष्टदायक आहे, असे मला वाटते. मात्र लग्न केले असते, तर किमान मी आई झाले असते.''
बॉलिवूमध्ये कमबॅक
''चांगली भूमिका आल्यास निश्चित मी बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. माझे अॅक्टिंग करिअर संपलेले नाही. फक्त माझ्या कामाचे मी योग्य मानधन घेईल.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कल्पनाचे निवडक फोटोज...