आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाने 23 वर्षे मोठ्या आदित्यसोबत लिव्ह-इनमध्ये होती कंगना, या अॅक्टसोबतही जुळले नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री कंगना रनोट सध्या तिचा एक्स बॉयफ्रेंड हृतिक रोशनमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या 28 व्या वर्षी कंगना तिच्यापेक्षा वयाने 14 वर्षे मोठ्या हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. विशेष म्हणजे त्यावेळी हृतिक विवाहित होता. इतकेच नाही तर घटस्फोटानंतर म्हणे हृतिकने कंगनासोबत साखरपुडासुद्धा केला होता. आता मात्र दोघांचे ब्रेकअप झाले आहे. एखाद्या विवाहित पुरुषासोबत कंगनाचे नाव जुळल्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वीही दोन विवाहित पुरुषांसोबत कंगनाचे प्रेमसंबंध होते.
वयाने 23 वर्षे मोठ्या आदित्य पांचोलीसोबत होते लिव्ह इन रिलेशन
- कंगना करिअरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा स्ट्रगल करत होती, त्यावेळी तिचे नाव तिच्यापेक्षा वयाने 23 वर्षांनी मोठ्या आदित्य पांचोलीसोबत जुळले होते.
- विवाहित आणि दोन मुलांचे वडील असलेल्या आदित्यसोबत कंगनाने अनेकदा सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली होती.
- आदित्य कंगनाचा मेंटर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य आणि कंगना लिव्ह इन रिलेशनशिपमध्येसुद्धा होते.
- याच वर्षी जानेवारी महिन्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कंगनाने आदित्यच्या नावाचा उल्लेख टाळत म्हटले होते, की बॉलिवूडच्या एका व्यक्तीने तिचे शोषण केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, कंगनाच्या इतर अफेअर्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...