आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Ranaut Call Hrithik Roshan Her ‘ex boyfriend’

...आणि कंगना म्हणाली, 'हृतिकसारखे एक्स बॉयफ्रेंड असेच वागतात'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा रागात माणूस खरं बोलून जातो. असचे काहीसे अभिनेत्री कंगना रनोटच्या बाबतीत घडले आहे. कंगना रनोटला 'आशिकी 3' मधून डच्चू दिला असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे अभिनेता हृतिक रोशनच्या सांगण्यावरुन कंगनाची या सिनेमातून हाकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंगना आणि आपल्या नावाची पुन्हा चर्चा होऊ नये अशी हृतिकची इच्छा होती. त्यामुळे त्याने 'आशिकी 3'च्या निर्मात्यांना तिला सिनेमासाठी साइन न करण्यास सांगितले.
याविषयी जेव्हा कंगनाला विचारणा झाली, तेव्हा ती म्हणाली, "हृतिकसारखे एक्स बॉयफ्रेंड असेच करतात. त्यामुळे मला काही फरक पडलेला नाही. मी माझ्या आयुष्य आणि कामात आनंदी आहे."
हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटाला आता वर्ष लोटले आहे. मध्यंतरी कंगना आणि हृतिकच्या रिलेशनशिपविषयी ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही कधीही आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली नाही.
पण आता कंगनाने हृतिकचा उल्लेख एक्स बॉयफ्रेंड म्हणून केल्यानंतर हे दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते आणि आता त्यांचे ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंगनाने हृतिकसोबत 'क्रिश 3'मध्ये काम केले होते.