आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: ड्रेसिंग रुम ते लिविंग एरियापर्यंत, असे आहे बॉलिवूड 'क्वीन' कंगना रनोटचे घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगनाचे घर - Divya Marathi
कंगनाचे घर
मुंबई - कंगना रनोट लवकरच आगामी चित्रपट 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मध्ये दिसून येणार आहे. नुकतेच कंगनाने तिच्या टीम मेंबर्ससोबत चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच केले. कंगना च्या घराचे काही इनसाईड फोटोज समोर आले आहेत. त्यात तिचे घर फारच सुंदर दिसत आहे. कंगनाने नुकतेच तिच्या घराला डेकोरेट केले आहे. ज्यानंतर तिचे घर अजूनच सुंदर दिसत आहे.
 
असे आहे कंगनाचे फॅमिली बॅकग्राउंड... 
 
कंगनाचे वडील अमरदीप रनोट बिजनेसमन आहेत. तिची मोठ्या बहिणीचे नाव रंगोली आहे. रंगोलीच कंगनाची मॅनेजर म्हणून तिचे काम पाहते. काही वर्षांपूर्वी अॅसिड अॅटॅक झाल्यामुळे रंगोलीचा चेहरा खराब झाला होता. पण या घटनेनंतरही तेवढ्याच आत्मविश्वासाने जीवन जगणाऱ्या रंगोलीवर बायोपिक बनविण्याची इच्छा असल्याचे कंगनाने सांगितले आहे. कंगनाला एक लहान भाऊही आहे ज्याचे नाव अक्षत रनोट आहे. 
 
कंगनाचा जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील सुरजपूर या लहान गावात झाला. 2006 साली गँगस्टर या चित्रपटातून तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यूचा अवॉर्डही मिळाला होता. या चित्रपटानंतर तिला 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर कंगनाने 'फैशन', 'वो लम्हें', 'लाइफ इन मेट्रो', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'तनु वेड्स मनु', 'क्वीन', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. पण तिचे 'रिवॉल्वर रानी', 'नो प्रोब्लम', 'नॉक आउट', 'आई लव एन वाय', 'कट्टी-बट्टी', 'रंगून' यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप राहिले.
 
'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या दोन्ही चित्रपटांसाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
 
पुढच्या 6 स्लाईडवर पाहा, कंगनाच्या घराचे INSIDE PHOTOS...  
बातम्या आणखी आहेत...