Home | Reviews | Movie Review | Kangana Ranaut Starrer Simran Movie Review

Movie Review : दमदार कंगना पण सुमार सिमरन, 'अलिगड'वाल्या मेहतांकडून निराशा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 15, 2017, 04:34 PM IST

कंगना रनोट पुन्हा एकदा ऑडियन्ससाठी सिंग तरुणीची कथा असलेला 'सिमरन' चित्रपट घेऊन आली आहे.

 • Kangana Ranaut Starrer Simran Movie Review
  रेटिंग 2/5
  स्टारकास्ट कंगना रनोट, मार्क जस्टीस, सोहम शाह, मनू नारायण, अनिस जोशी
  डायरेक्टर हंसल मेहता
  म्युझिक सचिन-जिगर
  प्रोड्युसर भूषण कुमार, क्रिशन कुरमा, शैलेश आर सिंह, अमित अग्रवाल
  जॉनर कॉमेडी ड्रामा
  'शाहीद'(2012), 'सिटी लाइट'(2014) आणि 'अलिगड'(2015) सारख्या चित्रपटांनंतर डायरेक्टर हंसल मेहता यांनी कंगना रनोटला लीड रोल देत कॉमेडी ड्रामा चित्रपट 'सिमरन' बनवला आहे. त्यांचा हा चित्रपट रिलीज झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसा आहे चित्रपट.
  पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी आहे सिमरन चित्रपटाची कथा, अॅक्टींग आणि संगीत..
 • Kangana Ranaut Starrer Simran Movie Review
  कथा  
  चित्रपटाची कथा अमेरिकेत राहणाऱ्या एका पटेल कुटुंबातील तरुणी प्रफुल पटेल म्हणजे कंगना रनोट हिची आहे. ती घटस्फोटीत असून कुटुंबाबरोबर राहत असते. एका हॉटेलमध्ये हाऊसकिपिंगचे काम करून ती उदरनिर्वाह करत असते. कुटुंबाशी तिचे फारसे जमत नसते. तिच्या दुसऱ्या लग्नासाठी घरचे प्रयत्न करतात, पण ते शक्य होत नाही. त्याचवेळी लास वेगासमध्ये तिच्या एका मैत्रिणीचे लग्न होते. याठिकाणी ती जाते आणि हॉटेलमध्ये जुगार खेळताना सर्व पैसे हारते. एवढ्यावरच न थांबता ती हॉलेवाल्यांकडून पैसे उधार घेते आणि तेही हारते. कमाई फारशी नसल्याने ती हे कर्ज फेडण्यासाठी चोरी, बँक लुटणे अशी कामे सुरू करते. या दरम्यान काही मुलांच्या संपर्कात ती येते. पण पुढे काहीही होत नाही. प्रफुलला खरे प्रेम मिळते का आणि तिला कर्ज फेडता येते का, हे समजण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे. 

   
 • Kangana Ranaut Starrer Simran Movie Review
  डायरेक्शन
  डायरेक्शन चांगले आहे. विदेशात शुटिंग झालेले असल्याने अनेक चांगले लोकेशन्स पाहायला मिळाले आहेत. कथेबाबत बोलायचे झाले तर अनेक ठिकाणी निराशा झाल्याचे जाणवते. फर्स्ट हाफ दर्शकांना खिळवून ठेवतो, पण सेकंड हाफमध्ये कथा विखुरल्याचे पाहायला मिळते. स्क्रीनप्लेही आणखी चांगले होऊ शकले असते. यामुळे हंसल मेहतांच्या दिग्दर्शनावर प्रश्नचिन्हं उभे राहते. कारण प्रेक्षकांना त्यांच्याकडून एका चांगल्या चित्रपटाची अपेक्षा होती, त्या अपेक्षा या चित्रपटातून पूर्ण होत नाहीत. 
   
 • Kangana Ranaut Starrer Simran Movie Review
  अॅक्टींग
  चित्रपटात फक्त आणि फक्त कंगनावर फोकस ठेवण्यात आला आहे. तिची अॅक्टींग चांगली आहे, यात काहीही शंका नाही. पण तिच्याशिवाय एकही कॅरेक्टर लक्षात राहत नाही. कास्टींग अधिक चांगली करता आली असती.
   
 • Kangana Ranaut Starrer Simran Movie Review
  म्युझिक 
  चित्रपटाचे म्युझिक आधीच रिलीज झाले आहे, त्याला फारशी कमाल करता आलेली नाही. त्यात चित्रपटाचे सर्वात चांगले गाणे 'सिंगल रहने दे' शेवटी क्रेडीटबरोबर दाखवले आहे. बॅकग्राऊंड स्कोअर चांगला आहे. 

   
 • Kangana Ranaut Starrer Simran Movie Review
  पाहावा की नाही 
  कंगना रनोट खूपच आवडत असेल तर एकदा पाहू शकता, पण जर हंसल मेहतांच्या चित्रपटांचे फॅन असाल तर तुमची निराशा होण्याची शक्यता आहे. 

Trending