आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या कुटुंबावर चढली यशाची धुंदी, पार्टीत पाहुण्यांसोबत केले गैरवर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः कंगना रनोट, तिचा भाऊ अक्षत आणि बहीण रंगोली)
एन्टरटेन्मेंट डेस्कः गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळालेले यश साजरे करण्यासाठी मंगळवारी रात्री मुंबईत सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पार्टीत जे घडले ते जाणून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या पार्टीत कंगनाच्या अवतीभोवती सतत तिचे बहीणभाऊ हजर होते. पार्टीत पोहोचलेल्या पाहुण्यांनी कंगनासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी पाहुण्यांना चक्क दूर ढकलले.
वितरक आणि ट्रेडच्या लोकांसाठी या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत कंगना दीड तास उशीरा पाहोचली होती. येथे तिच्याआधी पोहोचलेला तिचा भाऊ अक्षत आणि बहीण रंगोली यांची वागणूक विचित्र होती. रंगोली कंगनाच्या पीआरसारखे वागत होती तर भाऊ बॉडीगार्ड बनला होता. दोघांनीही पाहुण्यांना कंगनापासून कटाक्षाने दूर ठेवले.
आमंत्रित पाहुण्यांपैकी काही तरुण आणि महिलांनी कंगनासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा रंगोलीने त्यांना दूर ढकलले. निर्माती कृषिका लुल्ला आणि इरोसच्या लोकांसोबत कंगना डान्स करत होती. मात्र रंगोली आणि अक्षतने तिला तेथून बाहेर काढले.
कंगनाच्या शुभचिंतकांच्या मते, तिच्या यशाची धुंदी बहीणभावांवर चढली आहे. कंगनाच्या कुटुंबीयांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितल्यानुसार, तिचे कुटुंब तिच्या यशाचा फायदा घेऊ इच्छित आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पार्टीची निवडक छायाचित्रे...