आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Says It Was A Very Difficult And Very Harsh Time

कंगनाचा खुलासा, \'वयाच्या 17 व्या वर्षी झाले होते शोषण, आरोपीला केली होती सँडलने मारहाण\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री कंगना रनोट - Divya Marathi
अभिनेत्री कंगना रनोट
मुंबई - वयाच्या 17 व्या वर्षी एका व्यक्तीने आपले शारीरिक शोषण केल्याचा खुलासा अभिनेत्री कंगना रनोट हिने केला आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात कंगनाने सांगितले, ''जेव्हा एक व्यक्ती मला सतत त्रास देत होती, तेव्ही मी त्याला सँडलने मारले होते.'' येथे कंगनाने त्या आरोपी व्यक्तीचे नाव मात्र उघड केले नाही. कंगनाचा पहिला सिनेमा 2006 मध्ये आला होता.

जाणून घेऊयात, कंगनाने आणखी काय सांगितले...
- इंडस्ट्रीत कधी अशा घटनेला सामोरे जावे लागले होते, का? पत्रकरांच्या या प्रश्नावर कंगना म्हणाली, "मी स्वतःला येथे अडकलेली समजत होते. लोक आपल्याला मदत करतील, हा आपला भ्रम असतो. येथे फुकट काहीच मिळत नाही. जेव्हा तुम्ही मदतीच्या आपेक्षेने जाता तेव्हा तुम्ही कल्पनाही करु शकत नाही असे लोक तुम्हाला भेटतात."
- वयाच्या 17 व्या वर्षी घडलेल्या घटनेविषयी कंगनाने सांगितले, "माझ्या वडिलांच्या वयाच्या एका व्यक्तीने मला डोक्यावर जोरात मारले होते. तेव्हा मी 17 वर्षांची होती. डोक्यातून रक्त वाहू लागले होते. मीसुद्धा त्याला सँडलने मारले. त्याचेही रक्त निघाले. त्यानंतर मी पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती."
- त्या व्यक्तीच्या विरोधात अॅक्शन घेण्यात आली होती का? असे विचारल्यावर कंगनाने सांगितले, "त्या शिक्षा मिळाली नाही. मात्र त्याला चेतावनी देऊन सोडण्यात आले. त्यानंतर त्याने कधीच माझा पाठलाग केला नाही. यापूर्वी कधीही अशी घटना माझ्यासोबत घडली नव्हती."
कुठे केला हा खुलासा?
- पत्रकार बरखा दत्तच्या द अनक्वाइट लँड या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कंगनाने ही गोष्ट शेअर केली.
- ती म्हणाली, "ती माझ्या आयुष्यातील अतिशय दुःखद घटना होती. मला शारीरिक त्रास देण्यात आला होता. मात्र आता मी फार खोलात शिरणार नाही."
पुढे पाहा, फोटोज...