आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फिल्मसाठी हॉलिवूडच्या स्टंट दिग्दर्शकाकडे कंगना शिकतेय तलवारबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशीच्या राणीवर चित्रपट तयार होत आहे. कंगना रनोट त्यात मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून तो अनेक कारणांनी गाजला. अगोदर कंगनाने स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप झाला तर नंतर थेट पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. आता कंगनाने थेट हॉलिवूडचा स्टंट डायरेक्टर निक पॉवेलकडून तलवारबाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. 

'बाहुबली'चे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिलेल्या पटकथेनुसार तलवारबाजी आणि इतर शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. 'गेल्या आठवड्यापासून निक ट्रेनिंग देण्यासाठी अमेरिकेवरून आला आहे,' असे कंगनाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली, 'मी सध्या मुव्हमेंट आणि बेसिक ज्ञान शिकत आहे. माझे मनगट जेव्हा फ्री होईल तेव्हा दोन्ही हातांनी तलवार चालवण्याचे प्रशिक्षण सुरू होईल. घोडेस्वारी आणि लढाईसाठी सध्या फिजिकल फिटनेसवर मी ध्यान देत असून निक त्यावर लक्ष ठेवून आहे.' 

पुढे वाचा, कंगनाच्या 'मणिकर्णिका'पुढे आजही अडचणी...