आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Was Not Invited For Saif And Kareena's Private Party

BUZZ: सैफ आणि करीनाच्या प्रायव्हेट पार्टीत कंगना होती 'बिन बुलाई मेहमान'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः  कंगना रनोट, करीना कपूर आणि सैफ अली खान - Divya Marathi
फोटोः कंगना रनोट, करीना कपूर आणि सैफ अली खान
मुंबईः काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीनाने आपल्या घरी एका खासगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कंगना रनोटसुद्धा सहभागी झाली होती. मात्र आता बातमी आहे, की या पार्टीसाठी कंगनाला आमंत्रित करण्यातच आले नव्हते. कंगनाने स्वतःहून या पार्टीत सहभागी झाली होती. झाले असे, की पार्टीच्या संध्याकाळी कंगनाने सैफला फोन केला आणि म्हटले, की तुझ्या घरी पार्टी सुरु असल्याचे मला कळले, मी या पार्टीत येऊ शकते का? सैफ तिला नाही म्हणू शकला नाही आणि कंगनाला पार्टीत सहभागी होऊ दिले. आश्चर्याची बाब म्हणजे, कंगनाने पार्टीची होस्ट करीनाऐवजी सैफशी याविषयी बोलणे केले.
या पार्टीत कंगनाची उपस्थिती चर्चेत राहिली. कारण सैफच्या आगामी एका सिनेमात कंगना त्याची हीरोईन आहे. विशेष म्हणजे या सिनेमात शाहिद कपूरसुद्धा काम करत आहे. मात्र शाहिद या पार्टीत सहभागी झाला नाही. त्याचे कारण वेगळे काही सांगायला नको, नाही का... करीनाने 'की अँड का'च्या सक्सेस निमित्ताने ही पार्टी ठेवली होती.

बातम्यांनुसार, सैफ 'रंगून' सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एक पार्टी देणार असून त्यामध्ये कंगना आणि शाहिदसोबत दिग्दर्शक विशाल भारद्वाज सहभागी होणार आहेत. रंगूनमध्ये हे सैफ, कंगना आणि शाहिद एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करीना-सैफच्या पार्टीत कोणकोणते सेलेब्स सहभागी झाले होते...