आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'शीना मर्डर केस\' फिल्मचे पोस्टर रिलीज, भोजपुरी अॅक्ट्रेस सपना साकारणार इंद्राणी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शीना बोरा मर्डर प्रकरणाची बरीच चर्चा सुरु आहे. याविषयावर काही फिल्ममेकर्सनी सिनेमा बनवण्याचे प्लानिंग केले आहे. बी आणि सी ग्रेड सिनेमांची दिग्दर्शिका कांती शाह यापैकीच एक आहे. त्यांनी या प्रकरणावर सिनेमा बनवण्याचे ठरवले असून सिनेमाचे नाव 'शीना मर्डर केस' असे ठेवले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे एक पोस्टरसुद्धा रिलीज करण्यात आले आहे.
कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचे पती आणि अक्षय कुमार स्टारर जोकर या सिनेमाचे दिग्दर्शक शिरीष कुंदर यांनी या सिनेमाचे पोस्टर आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आणि कांती शाहविषयी लिहिले, "लो कर लो बात"
कांती शाहच्या या सिनेमात शीनाची आई इंद्राणीची भूमिका भोजपुरी अभिनेत्री सपना सप्पू साकारणार आहे. सपना यापूर्वी 'एमएमएस कांड' यासह अनेक बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शीना मर्डर केस या सिनेमाचे पोस्टर आणि सोबतच इंद्राणीची भूमिका साकारणा-या सपनाची निवडक छायाचित्रे...