आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी ऑफिसरची मुलगी आहे कपिल शर्माची 'पत्नी', खऱ्या आयुष्यात आहे इतकी ग्लॅमरस..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'किस किसको प्यार करूं'(2015)  मध्ये कपिल शर्माची पत्नी जूहीची भूमिका करणाऱ्या मंजिरी फडणीसचा 10 जुलै रोजी 33 वा वाढदिवस आहे. चित्रपट फ्लॉप झाला तरी मंजिरीच्या भूमिकेचे बरेचसे कौतुक झाले होते. खूप कमी लोकांना माहीत आहे की 2004 साली बॉलिवूडमध्ये इंट्री करणाऱ्या मंजिरीचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. वडिलांच्या ट्रांसफरच्या निमित्ताने मंजिरी पूर्ण देश फिरली आहे. पारंपारिक मराठी कुटुंबात जन्मलेल्या मंजिरीने कधीची हा विचार नव्हता केला की ती कधी अभिनेत्री बनेल. तिच्या कुटुंबातील कोणीच ग्लॅमर वर्ल्डमधील नाही अशावेळी मंजिरीने चित्रपटात करिअर करण्याचा निर्णय घेतला. एका टीव्ही शोपासून मंजिरीने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मंजिरी रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी अजून काही माहिती.. 
 
- मंजिरीचा जन्म मुंबई (महाराष्ट्र) येथे झाला. तिचे बालपण पुणे येथे गेले. 
- मंजिरीने सर्वात पहिले रिअॅलिटी शो 'पॉपस्टार्स' (2004) मध्ये काम केले.
- या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभारी झालेल्या मंजिरीने फायनल 8 मध्ये स्थान मिळवले होते. 
- या शोला मंजिरीच्या अॅक्टींगची सुरुवात म्हटले जाते. 
 
साईड रोलमुळे मिळाली ओळख..
- 2004 साली मंजिरीने पहिला बॉलिवूड चित्रपट 'रोक सको तो रोक लो' केला.
- मंजिरीला तिच्या डेब्यू चित्रपटातून तितकी ओळख मिळाली नाही जितकी जेनेलिया डिसुजा आणि इमरान खानच्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातील एका साईडरोलमुळे मिळाली. 
- याशिवाय मंजिरीने 'मुंबई सालसा'(2007) 'जोकोमो' (2011), 'ग्रँड मस्ती' (2013) आणि 'वार्निंग' (2013), 'किस किस को प्यार करूं'(2015) आणि 'वाह ताज'(2016) या चित्रपटात काम केले आहे. 
 
रिजनल चित्रपटातही केले आहे काम..
- मंजिरीने हिंदीव्यतिरीक्त बंगालीमध्ये 'फालतू' (2006), तेलुगुमध्ये 'Siddu from Sikakulam'(2008), 'Shubhapradham'(2010) आणि 'Shakti'(2011), तामिळमध्ये 'Muthirai'(2009) आणि कन्नडमध्ये 'Munjane'(2012) या चित्रपटात काम केले आहे. लवकरच मंजिरी 'मिस्टर फ्रॉड' या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मंदिरीचे 10 ग्लॅमरस फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...