आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा लवकरच करु शकतो लग्नाची घोषणा, गर्लफ्रेंडने ठेवली होती एक अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - कपिल शर्मा लवकरच गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्नाची घोषणा करण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, गिन्नीच्या पालकांचा दबाव आहे, की लवकरात लवकर कपिलसोबतच्या रिलेशनशिपला जाहीर करावे. कपिलच्या आईचेही हेच मत आहे. मात्र, गिन्नीचे म्हणणे आहे, की ती कपिलसोबत तेव्हाच लग्न करणार जेव्हा तो त्याची सर्व कामे संपवेल. 
 
कपिलसोबत लग्नासाठी गिन्नीची अट
- गिन्नीला कपिलसोबत लग्न करण्याची इच्छा आहे, मात्र तरीही तिची एक अट असल्याचे कळते. 
- गिन्नीचे म्हणणे आहे, की कपिलसोबत तेव्हाच लग्न करणार जेव्हा तो दारू बंद करेल. ताज्या माहितीनुसार कपिलने गिन्नीची ही अट पूर्ण केली आहे. म्हणजेच त्याने दारू सोडलेली आहे. 
- दुसरे असे की याच महिन्यात त्याचा मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट 'फिरंगी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या तो त्याच्या सर्व कमिटमेंट्सपासून फ्री आहे. त्यामुळे शक्यता वर्तवला जात आहे, की लवकरच तो लग्नच्या तारखेची घोषणा करु शकतो. 
- विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची चर्चा होती. मात्र त्याच्या एका निकटवर्तीयाने सांगितले, की या सर्व अफवा आहेत. 
- काही दिवसांपूर्वीच दोघेही सोबत शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर या अफवांना पूर्णविराम मिळाला होता. 
बातम्या आणखी आहेत...