आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : आमीरच्या गाजलेल्या चित्रपटात होती कपिल शर्माची ही ऑनस्क्रीन पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमोना चक्रवर्ती - Divya Marathi
सुमोना चक्रवर्ती
बडे अच्छे लगते है.. मालिकेतून प्रकाश झोतात आलेली आणि त्यानंतर कपिल शर्माच्या कॉमेडी शो मधून घराघरात पोहोचलेली सुमोना चक्रवर्ती सर्वांच्या चांगल्या परिचयाची आहे. सुमोनाने काही चित्रपटांमध्येही विविध भूमिका केली आहे. पण तिला जास्त प्रसिद्धी मिळाली ती कॉमेडीयन कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी म्हणूनच.

राणी मुखर्जीच्या भावाबरोबर विवाह करणार असल्याच्या बातम्यांनीही सुमोना काही दिवसांपूर्वी चांगलीच प्रसिद्धीस आली होती. सुमोनाबाबत आणखी एक खुलासा आम्ही आज करणार आहोत, जे कदाचितच तुम्हाला माहिती असेल. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानच्या एका तुफान गाजलेल्या चित्रपटात सुमोना मुखर्जीने भूमिका केली होती. तीही बाल कलाकार म्हणून.

आमीर खान आणि मनिषा कोइराला यांच्या मन या चित्रपटामध्ये सुमोना मुखर्जी आपल्याला पाहायला मिळते. एवढेच नाही तर विद्यार्थी नावाच्या एका चित्रपटातही तिने बालकलाकार म्हणून भूमिका केले असल्याची माहिती मिळत आहे. चला तर मग पाहुयात कसी दिसत होती मन चित्रपटातील बाल कलाकार सुमोना.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुमोनाचे मन चित्रपटातील भूमिकेचे काही स्क्रीनशॉट्स... शेवटच्या स्लाइडवर पाहा, व्हिडीओ..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...