आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: अनिल कपूरच्या मुलाच्या फिल्म लाँचला दोन जावांसोबत दिसली श्रीदेवी, हे स्टार्सही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मंगळवारी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी \'मिर्झिया\' या सिनेमाचे ग्रॅण्ड म्युझिक लाँच झाले. या सिनेमातून अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत सयामी खेर ही नवोदित अभिनेत्री झळकणारेय. या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हजर होते.
 
आपल्या मुलाला चिअर अप करण्यासाठी अनिल कपूर आणि त्याची सुनीता कपूर आवर्जुन इव्हेंटमध्ये उपस्थित होते. याशिवाय हर्षवर्धनचे काकू-काका अर्थातच बोनी कपूर-श्रीदेवी, संजय कपूर-महीप कपूरसुद्धा येथे दिसले. हर्षवर्धनच्या सख्ख्या बहिणी सोनम कपूर, रिया कपूर, आजी निर्मल कपूर (अनिल कपूची आई) यांच्यासह या घराण्याच्या तीन पिढ्या या इव्हेंट्मध्ये सहभागी झाल्या होत्या. पुतण्या हर्षवर्धनच्या पहिल्या सिनेमाच्या लाँचिगला पोहोचलेली श्रीदेवी यावेळी तिच्या दोन्ही जावा सुनीता आणि महिपसोबत दिसली. 

 
स्वबळावर मिळाला माझ्या मुलाला सिनेमाः अनिल कपूर
मुलगा हर्षवर्धनच्या डेब्यू फिल्मच्या लाँचवेळी अनिल कपूर इमोशनल दिसले. ते म्हणाले, हर्षवर्धनने जे काही मिळवले, ते स्वबळावर मिळवले आहे. पत्रकारांशी बोलताना अनिल म्हणाले, \"एक स्टार किड सिनेसृष्टीत आल्याने लोक आनंदी आहेत, हे माहित आहे मला. मात्र मी सांगू इच्छितो, की हर्षला आज जे काही मिळाले आहे, ते त्याने स्वतःच्या बळावर मिळवले आहे. स्टार किड असूनदेखील मी त्याला काहीच दिलेले नाही. मेहरा यांनी त्याला पाहिले, सिनेमाचे बारकावे शिकवले आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीनंतर \'मिर्झिया\' बनून तयार आहे.\"

इमोशनल झाले अनिल कपूर..
मुलाविषयी सांगताना अनिल कपूर भावूक झालेले दिसले. ते म्हणाले, \'\'माझे संपूर्ण कुटुंबाने फिल्मी बिझनेसमध्ये राहण्यासाठी खूप घाम गाळला आहे. कामाविषयी कधीही कुणीही तडजोड केलेली नाही. आम्ही इंडस्ट्रीसाठी आमचे सर्वस्व दिले आहे. एवढ्या वर्षांत मला जे प्रेम मिळाले, ते आता माझ्या मुलाला मिळावे, एवढीच माझी इच्छा आहे.\'\' \'मिर्झिया\' हा सिनेमा 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होणारेय. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मिर्झियाच्या म्युझिक लाँचला क्लिक झालेले PHOTOS... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...