आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan, Harman & John, A Look At Bipasha Basu’S Love Affairs

करण सिंह ग्रोवरपूर्वी या 5 अभिनेत्यांसोबत जुळले आहे 'बिल्लो राणी'चे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून डीनो मोरियासोबत बिपाशा, उजवीकडे करण सिंह ग्रोवरसोबत बिपाशा बसु - Divya Marathi
डावीकडून डीनो मोरियासोबत बिपाशा, उजवीकडे करण सिंह ग्रोवरसोबत बिपाशा बसु
बिपाशा बसु आज (7 जानेवारी) 37वा वाढदिवस साजरा करत आहे. बातम्यांनुसार, यावेळी बर्थडे पार्टीदरम्यान ती आपले नाते स्वीकारणार आहे. बिपाशा मागील एक वर्षांपासून करण सिंह ग्रोवरला डेट करत आहे. त्याच्यासोबतचे फोटोदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
अनेक अभिनेत्यांसोबत जुळले नाव...
करणपूर्वी बिपाशाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जुळले आहे. त्यामध्ये हरमन बवेजा, राणा दुग्गुबती, सैफ अली खान, जॉन अब्राहम आणि डिनो मोरिया यांची नावे सामील आहेत. जॉन आणि डिनोसोबत बिपाशा अनेक वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिली.
'अलोन' सिनेमादरम्यान वाढली करणसोबत जवळीक...
बिपाशा आणि करण यांची मैत्री 'अलोन' सिनेमाच्या सेटवर झाली होती. नंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सिनेमातील बिपाशा-करणची केमिस्ट्री प्रेक्षकांनी पसंत केली. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले. मात्र दोघांनी अद्याप नात्याचा स्वीकार केलेला नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बिपाशाच्या अफेअर्सविषयी...