आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18,000 SqFt मध्ये आहे करण जोहरचे आलिशान ऑफिस, ही आहे बेंचपासून वॉलपर्यंतची कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आणि अभिनेता करण जोहरचा आज (25 मे) वाढदिवस असून त्याने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. करणची बॉलिवूड करिअरची सुरुवात 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमापासून झाली. आतापर्यंत करणने त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या बॅनरमध्ये अनेक हिट सिनेमे बनवले आहेत. करणचे धर्मा प्रॉडक्शन हे प्रॉडक्शन हाऊस मुंबईतील अंधेरी परिसरात आहे. त्याने त्याच्या ऑफिसमधील इंटेरिअर अतिशय खास बनवले आहे.
 
करण जोहरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय धर्मा प्रॉडक्शन हाऊसचे इनसाइड फोटोज आणि त्याच्याशी निगडीत रंजक गोष्टी... 

काय आहे धर्मा ऑफिसचे वैशिष्ट्य..
- करणचे प्रॉडक्शन हाऊस पुर्वी खास परिसरात होते. मात्र नोव्हेंबर 2015 मध्ये करणने नवीन ऑफिस अंधेरी येथे सुरु केले. 18,000 Sqft मध्ये परसलेल्या या ऑफिसच्या इंटेरिअरला तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागला होता.
- सिमोन दुबाश पंडोले यांनी या ऑफिसचे इंटेरिअर साकारले आहे. ऑफिसच्या कॉरिडोर, सिटिंग एरिया, कँटीन, केबिनपासून ते रिसेप्शन एरियापर्यंत प्रत्येक गोष्ट अतिशय खास पद्धतीने सजवण्यात आली आहे. ऑफिसच्या भींतींवर धर्मा प्रॉडक्शनच्या सुपरहिट सिनेमांचे पोस्टर्स बघायला मिळतात. 

1976 साली झाली होती धर्मा प्रॉडक्शनची स्थापना
- धर्मा प्रॉडक्शनचा पाया 1976 साली करण जोहरचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते यश जोहर यांनी रचला होता. 
- प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा 'दोस्ताना' हा 1980 साली रिलीज झाला होता.
- 'दोस्ताना'नंतर 'अग्निपथ'(1990), 'कुछ कुछ होता है'(1998), 'कभी खुशी कभी गम'(2001), 'कल हो ना हो'(2003), 'कभी अलविदा ना कहना'(2006), 'माई नेम इज खान'(2010), 'स्टूडंट ऑफ द इयर'(2012), 'ये जवानी है दीवानी'(2013), '2 स्टेट्स'(2014), 'बार बार देखो'(2016), 'ऐ दिल है मुश्किल'(2016), 'बद्रीनाथ की दुल्हनिया'(2017) सह सुमारे 35 हून अधिक सिनेमे या बॅनरमध्ये तयार झाले आहेत.
- प्रॉडक्शन हाऊसचे आगामी सिनेमे 'ड्रेगन', 'ड्राइव' आणि 'इत्तेफाक' हे आहेत. अद्याप या सिनेमांची रिलीज डेट निश्चित झालेली नाही. 

पुढील स्लाईड्सवर बघा, धर्मा प्रॉडक्शनचे 16 INSIDE PHOTOS आणि वाचा ऑफिसशी निगडीत रंजक गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...