आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोग्राफीत करणचा शॉकिंग खुलासा, म्हणाला अजयमुळे तुटली काजोलसोबतची मैत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या 'द अनसूटेबल बॉय' या त्याच्या बायोग्राफीमुळे चर्चेत आहे. या बायोग्राफीत करणने त्याच्या आणि काजोलच्या नात्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. काजोलसोबतचे त्याचे 25 वर्षे जुने नाते संपुष्टात येण्यास अजय देवगण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर आता पुन्हा कधीही काजोलसोबत मैत्री होऊ शकणार नसल्याचेही त्याने म्हटले आहे.  
 

आयुष्यात कधीच देणार नाही काजोलला स्थान... 
बॉलिवूड वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून करण आणि काजोल यांच्या मैत्रीत दुरावा आल्याची चर्चा रंगताना दिसते. मात्र खुद्द करणने काजोलसोबतच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे. आता सर्व संपले आहे. ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. मला वाटते तिलाही हेच हवे आहे. असे करणने म्हटले. तसेच करण पुढे म्हणाला की, एका वेळी ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, पण तिने माझ्या 25 वर्षांच्या भावनांकडे पाठ फिरवली आहे.

अजयमुळे तुटली मैत्री... 
सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, दोघांच्या मैत्रीतील कारण काजोलचा पती आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचीही चर्चा रंगताना दिसते. अजय देवगनचा ‘शिवाय’ आणि करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ दिवाळीच्या मुहूर्तावर 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या आनंदमयी वातावरणामध्ये अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘शिवाय’ आणि करण जोहरचा बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. यावेळी काजोल पती अजय देवगनला चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये हातभार लावताना दिसली होती. अजयच्याच निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटाकडे अनेकांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ ने बाजी मारली होती. त्यावेळीपासून काजोल आणि करणच्या मैत्रीत दरी निर्माण झाली असल्याचे देखील बोलले जात आहे.
 

याविषयी अजयने दिली प्रतिक्रिया...
करणच्या बायोग्राफीतील या खुलासानंतर अजयने करणच्या नावाचा उल्लेख न करता एक ट्विट केले आहे. अजयने ट्विट केले, "Request:- pls stop printing old interviews. Answers are dependent on time remember?"  
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, करणच्या बायोग्राफीतील ती पाने, ज्यामध्ये करणने काजोलसोबतच्या त्याच्या नात्याविषयीचा उल्लेख केला आहे.