आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Twist In The Love Story: करणच्या आईला आवडली नाही बिपाशा बसु!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: एका वर्षापेक्षा जास्त दिवसांपासून एकमेकांना बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर डेट करताय. जिम, स्पा, इव्हेंट्स, पार्टी आणि एकत्र सुटी घालवताना दिसतात. सोशल मीडियावर करणने अनेकदा बिपाशा त्याच्या आयुष्यात किती खास आहे, हेदेखील सांगितले आहे. दोघांचे प्रेम चाहते किंवा कुटुंबीयांपासून लपलेले नाहीये. दोघे एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचेसुध्दा सांगितले जात होते. परंतु आता असे होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
करणच्या आईला पसंत पडली नाही बिपाशा...
इंडस्ट्रीच्या एका अभिनेत्रीचे म्हणणे आहे, की करणची आई दीपा सिंहला बिपाशा आवडत नाही. त्यांनी सून म्हणून बिपाशाला रिजेक्ट केले आहे. त्या बिपाशाचे भूतकाळातील नातेसंबंधांकडे पाहत आहेत. करणपूर्वी तिच्या आयुष्यात, डीनो मोरिया, जॉन अब्राहम आणि हरमन बावेजा आले होते. हे पाहून करणच्या आईला वाटते, की बिपाशा त्यांच्या मुलाविषयी गंभीर नाहीये.
मात्र, हे थोड विचित्रच वाटतय. कारण करणने स्वत: दोन लग्ने केली आहेत आणि त्याचा घटस्फोटसुध्दा झाला आहे. परंतु त्याच्या आईला बिपाशा सून म्हणून आवडत नाहीये. करणने आईला शब्द दिला आहे, की यावेळी तो आईच्या परवानगीने लग्न करणार आहे.
'अलोन'पासून सुरु झाले अफेअर...
करण आणि बिपाशाचे अफेअर जानेवारी 2015मध्ये रिलीज झालेल्या 'अलोन' सिनेमापासून सुरु झाले होते. दोघे नेहमी कुठेही एकत्र दिसतात.
बिपाशा बसुच्या घरच्यांना आवडला करण...
बिपाशाच्या घरच्यांनी करणला स्वीकारले आहे. त्यांनी करणला घरी आणि डिनरवर बोलावले आहे. परंतु बिपाशा आतापर्यंत करणच्या कुटुंबीयांसोबत दिसली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दोघांची सोबतची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...