आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाला करीनाच्या मुलाचा हा PHOTO, सैफ म्हणाला - होय हाच तैमूर आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान पतौडी येत्या 20 फेब्रुवारी रोजी 2 महिन्यांचा होणारेय. अलीकडेच तैमूरचा एख फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत तैमूरचा चेहरा स्पष्ट दिसतोय. ग्रे केस आणि ब्राऊन डोळ्यांचा तैमूर अतिशय क्यूट दिसतोय. सैफ अली खानने हा फोटो त्याच्या Whatsapp च्या डिस्पले पिक्चरमध्ये लावला होता. एन्टरटेन्मेंट पोर्टल spotboye मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सैफने हा फोटो तैमूरचा असल्याचे कन्फर्म केले आहे. पण काही वेळाने सैफने त्याच्या DP मधून हा फोटो काढून टाकला होता. 

तैमूर नावावरुन उठले होते वादंग?
करीनाने 20 डिसेंबर 2016 रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सैफीनाने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलेच वादंग उठले होते. तैमूर लंग हा इस्लामिक राजा होता. आपले साम्राज्य जगभर करण्यासाठी त्याने जगावर हल्ले केले होते. त्याला क्रूरकर्माही म्हणायचे. भारतावरही त्याने हल्ला करुन असंख्य लोकांना ठार मारले होते. तैमूरचा मृत्यू 1 एप्रिल 1405 रोजी झाला. त्याला उज्बेकिस्तानमध्ये दफन केले गेले.
 
सैफने सांगितला तैमूरचा अर्थ...
सैफने स्वतः आपल्या बाळाच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. तैमूर अली खान असलेल्या मुलाच्या नावाचा अर्थ Iron. तैमूर म्हणजे लोह. हे एक अरेबियन नाव आहे. तैमूर अली खानसाठी 8 हा लक्की नंबर असणार आहे. उर्दूमध्ये तैमूर हे नाव “تیمور” अशा प्रकारे लिहीलं जाईल.  त्याचप्रमाणे तैमूरचा दुसरा अर्थ पोलादासारखा भक्कमपणा आक्रमकता, अडथळयांवर मात करुन उत्तम निकाल देण्याची क्षमता. तैमूर या नावाचा सकारात्मकता, दृढ इच्छाशक्ती असाही अर्थ होतो.  सैफने सांगितले होते, जेव्हा आम्हाला मुलगा झाला तेव्हा करिना आणि मला तैमूर नाव आवडले. त्यामुळे आम्ही हे नाव ठेवले. माझ्यापेक्षा हे नाव करीनाला अधिक आवडले होते. 

2012 मध्ये झाले होते सैफ-करीनाचे लग्न...
सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्याच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले होते. 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचे अफेअर दीर्घ काळ शाहिद कपूरसोबत होते. मात्र शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफसोबत तिचे सूत जुळले. पाच वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले.  सैफ-करीनाच्या जोडीला सैफीना नावाने ओळखले जाते. दोघांची लव्ह स्टोरी 'टशन' (2008) या सिनेमाच्या सेटवरुन सुरु झाली होती.  दोघांनी कधीही त्यांचे रिलेशन मीडियापासून लपवून ठेवले नव्हते. करीनाचा (36) हा पहिला मुलगा आहे. तर सैफला पहिल्या पत्नीपासून म्हणजे अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, तैमूर अली खानची आणखी काही छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...