आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला जन्म देणार सैफची बेगम करीना, लंडनमध्ये केली गर्भलिंग परीक्षण चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच लंडनमध्ये फिरताना दिसले सैफ-करीना, उजवीकडे - एका इव्हेंटमध्ये क्लिक झालेला करीनाचा फोटो. - Divya Marathi
अलीकडेच लंडनमध्ये फिरताना दिसले सैफ-करीना, उजवीकडे - एका इव्हेंटमध्ये क्लिक झालेला करीनाचा फोटो.
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना एका मुलाचे आईबाबा होणार आहेत. एका वेबसाइटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, दोघांनी लंडन येथे गर्भलिंग परीक्षण चाचणी (Sex Determination) केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या डिसेंबर महिन्यात करीनाची डिलिव्हरी होणार असून तिच्या गर्भात असलेले बाळ हा मुलगा आहे.

अलीकडेच लंडनमध्ये फिरताना दिसले सैफ-करीना...
अलीकडेच सैफ आणि करीना लंडनच्या रस्त्यांवर वॉक घेताना दिसले होते. लंडनमध्ये त्यांनी लिंग परिक्षण चाचणी करुन त्यांना होणारे अपत्य मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेतले. भारतात गर्भलिंग परीक्षण चाचणी अवैध आहे. मात्र लंडनमध्ये तसं नाहीये. त्यामुळे या दाम्पत्याने परदेशात जाऊन ही चाचणी करुन घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून करीना प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. खरं तर सुरुवातीला करीनाने या बातम्या फेटाळल्या होत्या. मात्र सैफने सार्वजनिकरित्या कबुल केले, की करीना गर्भवती असून डिसेंबरमध्ये तिची डिलिव्हरी होणारेय.

आगामी सिनेमात प्रेग्नेंट दिसले करीना...
करीना सध्या तिच्या आगामी 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. योगायोग म्हणजे या सिनेमात करीना प्रेग्नेंट लेडीची भूमिका साकारणारेय. करीना यापूर्वी अर्जुन कपूरसोबत की अँड का सिनेमात झळकली होती. तर सैफ विशाल भारद्वाजच्या रंगून या सिनेमात शाहिद कपूर आणि कंगना रनोटसोबत झळकणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, करीना-सैफची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...