आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

800 कोटींचा आहे करिना-सैफचा Luxurious पटौदी पॅलेस, आतून आहे इतका सुंदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करिना कपूर खान आज 21 सप्टेंबर रोजी 37 वर्षाची झाली आहे. 2000 साली रिफ्युजी चित्रपटाने डेब्यु करणाऱ्या करिनाने 2012 साली भोपाळचा नवाब आणि अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले आहे. दोघांना एक मुलगाही आहे. त्याचे नाव आहे तैमूर अली कान. आज करिनाच्या वाढदिवसानिमित्त या पॅकेजमध्ये तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत सैफ आणि करिनाची हरियाणा येथील प्रसिद्ध कोठी म्हणजेच पटोदी पॅलेस. 800 कोटीचा आहे हा Luxurious पॅलेस..

- गुडगावपासून 26 किमी दूर पटौदी येथे सैफ-करिनाचा पांढरा महल म्हणजेच पटौदी पॅलेस आहे.
- या खानदानाचा इतिहास तसे पाहिले तर 200वर्षाहून अधिक जुना आहे. पण हा महल बनून जवळपास 81 वर्ष झाले आहेत. 
- पटौदी पॅलेसचे निर्माण 1935 साली 8 वे नवाब आणि भारतीय टीमचे पूर्व कॅप्टन इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी केले होते. 
- पटौदी पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी सांगितली जाते. आता हे हेरीटेज हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे.
100 हून जास्त नोकर करतात पॅलेसची सफाई...
- या पॅलेसमध्ये 150 रुम्स आहेत आणि 100 हून अधिक नोकर येथे काम करायचे पण आता तसे काही राहिले नाही.
- महलला  इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी बनवले तर 9 वे मंसूर अली उर्फ नवाब पटौदी यांनी विदेशी आर्कीटेक्टच्या मदतीने याचे रिनोवेशन केले. 
- या पॅलेसमध्ये अनेक ग्राउंड, गॅरेज आणि घोड्यांचे अस्तबल आहे. रिनोवेशननंतर सैफने सोशल मीडीयावर याची माहिती दिली होती. 
- रिनोवेशनची जबाबदारी जिम्मा दर्शिनी शाह यांना दिला होता. ज्यांनी मुंबईच्या घराचे इंटीरीअर केले होते. 
- या महलचे रिनोवेशन खूपच सुंदर आहे. या महलात ड्रॉईंग रुमशिवाय सात बेडरुम, ड्रेसिंग रुम आणि बिलियर्ड रुम आहे.
करिनाला फार आवडतो पटौदी पॅलेस..
- दिल्लीच्या कॅनॉट प्लेसचे डिझाईन तयार करणाऱ्या जिन रॉबर्ट टोर रसेल यांनी पटौदी पॅलेसच्या महलाचे डिझाईन तयार केले आहे. 
- नवाब पटौदीचे वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब लुटियंस दिल्लीमध्ये त्यागराज मार्गावरील बंगल्यात राहायला गेले होते. 
-  2003 साली मंसूर अली खान यांची आई साजिदा सुल्तान यांच्या मृत्यूनंतर त्यांना सरकारी बंगला सोडावा लागला. त्यानंतर नवाब पटौदी पत्नी शर्मिला टागोरसोबत येथे राहायला लागले. 
 - सैफ-करिनासाठी रुम नंबर आठ खास त्यांच्या लग्नाअगोदर तयार करण्यात आला होता. येथे त्यांनी त्यांचा 35 वा वाढदिवस सेलिब्रेट केला होता.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, पटौदी पॅलेसचे 11 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...