आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From ‘Refugee’ To ‘Bajrangi Bhaijaan\': Kareena Kapoor’s 15 Glorious Years In Bollywood

\'रेफ्युजी\' ते \'बजरंगी भाईजान\' : करीनाने फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण केली 15 Golden वर्षे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः अभिनेत्री करीना कपूर)
बॉलिवूड दिवा करीना कपूरने आज फिल्म इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण केली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 30 जून 2000 रोजी करीनाचा पहिला सिनेमा 'रेफ्युजी' रिलीज झाला होता. या 15 वर्षांत करीनाने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले.
करीनाच्या करिअरची 15 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने '15 Golden Years of Kareena' हे सोशल साइट ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
2000 मध्ये जे.पी.दत्तांच्या 'रेफ्युजी'मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत करीना मोठ्या पडद्यावर झळकली होती. करीनासोबतच अभिषेकचासुद्धा हा पहिलाच सिनेमा होता. 2001 हे वर्ष करीनाच्या करिअरसाठी फार महत्त्वाचे ठरले. यावर्षी तिचे एक दोन नव्हे तर तब्बल पाच सिनेमे रिलीज झाले होते. शिवाय 'अजनबी' आणि 'अशोका' या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. 2006 मध्ये पुन्हा एकदा करीनाने फिल्मफेअरवर आपले नाव कोरले.
करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' हा करीनाच्या करिअरमधील पहिला कमर्शिअल हिट सिनेमे ठरला होता. या सिनेमासाठीसुद्धा तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
'जब वुई मेट', 'गोलमाल', 'थ्री इडियट्स', 'रा वन', 'अशोका', 'चमेली', 'देव', 'ओमकारा', 'कुर्बान', 'वुई आर फॅमिली', 'गोलमाल 3', 'हीरोईन' यांसारख्या सिनेमांमधून करीनाने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. लवकरच करीना सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' या सिनेमात झळकणार आहे. शिवाय 'उडता पंजाब' या सिनेमाचे शूटिंग ती करत आहे.
करीनाच्या करिअरला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सिनेमांमधील करीनाच्या वेगवेगळ्या लूकची खास झलक दाखवत आहोत...