आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: Instagramवर नेहमी अॅक्टिव असते करीना कपूर-खान, पाहा Different Looks

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये 2000मध्ये एका अशा अभिनेत्रीने पदार्पण केले, जी बघता-बघता येथील आघाडीची अभिनेत्री ठरली. तिचा पदार्पणातला पहिला सिनेमा भलेही फ्लॉप ठरला, मात्र या अभिनेत्रीचे अभिनयाच्या बळावर अल्पावधीतच असंख्य चाहते निर्माण झाले. होय, आम्ही बोलतोय ते 'रेफ्यूजी' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पाऊल ठेवणा-या करीना कपूर खान हिच्याविषयी.

आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी करीनाचा वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 वर्षांपूर्वी करीनाने अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्युजी' या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. जसजसे करीनाचे करिअर पुढे जाऊ लागले, तसतशी तिच्या यशस्वी सिनेमांची संख्या वाढू लागली. 'कभी खुशी कभी गम', 'जब वी मेट', 'गोलमाल 3', 'बॉडीगार्ड', 'हीरोइन', '3 इडियट्स', 'सिंघम रिटर्न्स' यासह बरेच हिट सिनेमे करीनाच्या नावी जमा आहेत. बॉलिवूडमध्ये करीनाने जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. शिवाय करिअरमध्ये तिने सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्सह ब-याच अवॉर्ड्सवर आपली मोहोर उमटवली.

सैफ अली खानची बेगम आहे करीना...
करीनाचे लग्न बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत झाले आहे. या जोडीला सैफीना नावाने ओळखले जाते. दोघांनी पाच वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. 'टशन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान या दोघांचे सूत जुळले होते. खासगी आयुष्यातील ही लोकप्रिय जोडी प‍डद्यावर मात्र आपली छाप सोडू शकलेली नाहीये. करीना आता प्रेग्नेंट असून येत्या डिसेंबर महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या करीना 'वीरे दी वेडिंग' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

इंस्टाग्रामवर अॅक्टिव आहे करीना...
करीना सोशल नेटवर्किंग साइट्सवर नेहमी सक्रिय असते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची बरीच छायाचित्रे अपलोड केली आहेत. यापैकी काही छायाचित्रांमध्ये ती तिचा पती सैफ अली खानसोबत दिसते. करीना आपल्या आयुष्यातील अनेक क्षण कॅमे-यात कैद करत असते. इंस्टाग्रामवर उपलब्ध असेलल्या छायाचित्रांमध्ये करीना वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे. काही छायाचित्रांत ती ग्लॅमरस लूकमध्ये तर काहींमध्ये ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.
करीनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन आम्ही तिची काही निवडक छायाचित्रे घेतली आहेत. यामध्ये तिच्या वेगवेगळ्या लूक्ससोबतचे तिचा हटके अंदाजसुद्धा दिसत आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा ही खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...