आज करिना कपूर खान तिचा 37 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. बॉलिवूडच्या एका प्रतिष्ठीत घराण्यात करीनाचा जन्म झाला. लहानपणापासूनच करीनाला एकत्र कुटुंबात राहण्याची सवय होती. कपूर खानदानामध्ये इतके जम आहेत की ते सर्व एकत्र आले की घराला एखाद्या समारोहाचे स्वरुप येते.
लग्नानंतरही करीनाला तिच्या घराप्रमाणेच मोठे सासर मिळाले आहे. सैफ अली खानचेही कुटुंब मोठे आहे. त्यात आई, दोन बहिणी, जीजू, मुले यांचा समावेश आहे. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी यांचे निधन झाले आहे. लग्नानंतर करीना दोन सावत्र मुलांची आई बनली आहे. आज जाणून घेऊया तिच्या सासरकडील मंडळी..
सासू
करिनाची सासू शर्मिला टागोर आपल्या काळात एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. बंगाली बाला शर्मिला टागोर यांनी धर्म बदलून नवाब मंसूर अली खां पटौदी यांच्याबरोबर लग्न केले. करीनाचे तिच्या सासूसोबत फार चांगले संबंध आहेत, शर्मिला यांनी लग्नानंतर चित्रपटात काम केले नाही पण करीनाला लग्नानंतरच काय तैमूरच्या जन्मानंतरही काम करण्याची मुभा आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, करीनाच्या सासरची इतर मंडळी आणि त्यांचे फोटोज्...