आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Khan Is Going To Take Her Son Along With Her On His First International Trip Ever

अॅड कॅम्पेनसाठी परदेशात जाणार करीना, चिमुकला तैमूर आईबरोबर करणार पहिली विदेशवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैमूरला जन्म दिल्यानंतर करीना कपूर-खानने दोनदा विदेश दौरे केले. लंडन आणि दुबईला जाहिरातींच्या संदर्भात फोटोशूट करण्यासाठी करिनाने एक-एक आठवडा विदेशात घालवला होता. आता तिच्या पुढील लंडन दौऱ्यात करीना कपूर तैमूरला घेऊन जाणार असल्याचे समजते. असे झाले तर लंडन दौरा हा तैमूरचा पहिलाच विदेश दौरा असेल.
 
एका रिस्ट वॉच कंपनीबरोबर करीनाने काँट्रेक्ट केले आहे. या महिन्याच्या शेवटी जाहिरातीसाठी करीनाचा लंडन दौराही ठरवण्यात आला आहे. सध्या मानधन आणि शेड्यूल्डबाबत चर्चा सुरू असून जुलैमध्ये ही अॅड प्रदर्शित होईल. करीनाने कंपनीला होकार कळवला असल्याचे समजते. यावेळी मात्र तैमूरला समजू लागल्याने तोही आईबरोबर विदेशात जाईल. तेथे आठवडाभर तो वेगवेगळे पॉइंट पाहण्याचीही शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...