आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Khan’S Make Up Artist Did Shahid Kapoor’S Wife Mira Rajput’S Bridal Look

लग्नात मीराने घातली 75 लाखांची अंगठी, करीनाच्या मेकअप आर्टिस्टने सजवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीरा राजपूत, करीना कपूर खान, इन्सेटमध्ये मीराची अंगठी आणि मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्ट)
मुंबई- अभिनेता शाहिद कपूरने मंगळवारी (7 जुलै) आपल्यापेक्षा 13 वर्षे लहान मीरासोबत लग्नगाठ बांधली. लग्नामध्ये शाहिदने डिझाइनर कुणाल रावलची व्हाइट शेरवानी परिधान केला होती. मीराने अनामिका खन्नाने डिझाइन केलेला बेबी पिंक लहंगा परिधान केलेला होता. लग्नाच्या गेटअपमध्ये दोघेही शोभून दिसत होते. मीराची ज्वेलरी नवाबी स्टाइलची होती. बातम्यांनुसार, मीराने 75 लाखांची अंगठी हाताच्या बोटात घातलेली होती.
मीराच्या कॉस्ट्युमपासून ज्वेलरीपर्यंत, हेअरस्टाइलपासून मेकअपपर्यंत सर्वकाही परफेक्ट होते. रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी मीराला प्रसिध्द मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्टने तयार केले होते. विशेष म्हणजे, मल्लिका भट्ट शाहिदची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरची मेकअप आर्टिस्ट आहे. करीनाशिवाय मल्लिका अभिनेत्री प्रियांका चोप्रा, मलायका अरोरा खान यांच्यासाठीसुध्दा काम करते.
करीनाने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा-
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने शाहिदला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सांगितले, 'मी शाहिदला लग्नासाठी शुभेच्छा देते. मला विश्वास आहे, सैफसुध्दा त्याला शुभेच्छा देईल. हा (लग्न) आयुष्याचा एक चांगला आणि आनंदाचा क्षण आहे.' बातचीतवेळी करीना कपीरने असेही सांगितले, की 'मला लग्नामध्ये बोलावले नव्हते, परंतु मी त्याला खूप-खूप शुभेच्छा देते.'
शाहिद-मीराचे लग्न गुडगावच्या एका फार्महाऊसमध्ये मंगळवारी (7 जुलै) सकाळी 11 वाजता पंजाबी प्रथेनुसार झाले. लग्नात दोन्ही कुटुंबीय मिळून एकूण 40 पाहूणे उपस्थित होते. डिझाइनर कुणाल रावल, मसाबा गुप्ता, मधु मांटेना, निर्माता मुबीना रेटॉन्सी, कोरिओग्राफर बॉस्को मॉर्टिससुध्दा उपस्थित होत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसा होता मीरा राजपूतचा हळद, लग्न आणि रिसेप्शनमधील लूक...